कोल्हापूर: उदगाव येथे रेल्वेचा मोठा अपघात टळला

गणेश शिंदे
शनिवार, 3 मार्च 2018

या घटनेनेनंतर कोल्हापूरहुन मिरजेला जाणाऱ्या मालगाडी चालकाच्या लक्षात रुळातील बदल लक्षात आल्याने त्याने गाडी थांबवून याची कल्पना दिल्यानंतर त्यांनी संबंधित यंत्रणेला याची कल्पना दिली. यामुळे मोठा अपघात टळला.

जयसिंगपूर: सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील उदगाव( ता.शिरोळ) येथील रेल्वे ब्रिजला अज्ञात अवजड वाहनाने धडक दिल्याने रुळ दीड फूट बाजूला सरकले. मध्य रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनेनंतर कोल्हापूरहुन मिरजेला जाणाऱ्या मालगाडी चालकाच्या लक्षात रुळातील बदल लक्षात आल्याने त्याने गाडी थांबवून याची कल्पना दिल्यानंतर त्यांनी संबंधित यंत्रणेला याची कल्पना दिली. यामुळे मोठा अपघात टळला.

घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे ब्रीज खालून होणारी कोल्हापूर सांगली रस्त्यावरील वाहतुक बाय पास रस्त्याने वळवण्यात आली. तर रुळाचे काम सुरू केल्याने कोल्हापूर मिरज मार्गावरील रेल्वे सेवा ही बंद राहिली. अचानक वाहतुकीवर ताण निर्माण झाल्याने या मार्गावरही वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली. यामुळे बसेसचे वेळापत्रकही कोलमडले. 

या मार्गावर अतिशय संथ गतीने वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लग्नसराई व परीक्षांचा कालावधी असल्याने याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे.

Web Title: Marathi news Kolhapur news railway bridge accident