गुन्हे मागे घेण्याचा निर्णय समाधानकारक - पाचर्णे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आज विधान परिषदेत केलेल्या घोषणेबाबत शिरूरचे आमदार बाबूराव पाचर्णे म्हणाले, 'कोरेगाव भीमा दंगलीतील बाधितांना नुकसानभरपाईसह, इतर मागण्या आपण विधिमंडळात केल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेतील प्रस्तावावर बोलताना 9 कोटी 45 लाखांची नुकसानभरपाई, तसेच गुन्हे मागे घेण्याची मागणी मान्य केली, ही समाधानाची बाब आहे. आगामी काळात या परिसरात शांतता नांदावी, यासाठी वढू बुद्रुक तसेच कोरेगाव भीमा परिसरातील ऐतिहासिक स्थळांचा इतिहास, ऐतिहासिक संदर्भ व वस्तुस्थिती तपासून योग्य त्या कार्यवाहीसाठी सर्वपक्षीय समिती नेमावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे. याबाबतही मुख्यमंत्री योग्य ती कार्यवाही करतील, अशी अपेक्षा आहे.''
Web Title: marathi news koregaon bhima crime baburao pacharne