विहिरीत पडून बिबट्या मृत्यूमुखी; नान्नजदुमाला शिवारातील घटना

हरिभाऊ दिघे
मंगळवार, 23 जानेवारी 2018

तळेगाव दिघे (जि. नगर) - संगमनेर तालुक्यातील नान्नजदुमाला शिवारात शेतातील विहिरीत दोन वर्षे वयाचा मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. मंगळवारी सकाळी 7च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. संगमनेर तालुक्यात तीन दिवसात एकापाठोपाठ हा तिसरा बिबट्या मृत्युमुखी पडल्याने चिंता व्यक्त होत आहे.
 नान्नजदुमाला शिवारातील बाळासाहेब गर्दे व विठ्ठल तोरे यांच्या पन्नास फुट खोल विहिरीत मादी बिबट्या मृतावस्थेत पाण्यावर तरंगताना आढळून आला. 

याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. वनक्षेत्रपाल बी. एल. गीते यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक एस. बी. ढवळे, संगीता कोंढार, वनकामगार बबन गायकवाड, डी. एल गायकवाड यांनी मृत बिबट्यास विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी बिबट्यास निंबाळे येथील रोपवाटिकेत हलविण्यात आले. शवविच्छेदन अहवालानंतर बिबट्याच्या मृत्यूचे निश्चित कारण समजू शकेल. नजीकच्या शेतात बिबट्याने एका कुत्र्याचा फडशा पाडला होता. त्यानंतर पाण्याच्या शोधार्थ बिबट्या विहिरीत पडला असावा असा अंदाज आहे. मृत बिबट्यास बघण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेने परिसरात बिबट्यांचे वास्तव्य अधोरेखित झाल्याने ग्रामस्थांमध्ये भिती पसरली आहे.

मृत्यू चिंताजनक! 
रविवारी सकाळी अकलापूर (ता. संगमनेर) शिवारातील मुंजेवाडी व पांडोबाचा ओढा येथे दोन मादी बिबटे मृतावस्थेत आढळून आले होते. त्यापाठोपाठ मंगळवारी सकाळी नान्नजदुमाला शिवारात विहिरीत मादी बिबट्या मृतावस्थेत आढळला. एकापाठोपाठ होणारे बिबट्यांचे मृत्यू चिंतेचा विषय बनले आहेत.

Web Title: marathi news leopard found dead in the well