"लिथली आर्च' तंत्रातून साकारतोय आधुनिक पूल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

कोरेगाव - येथील केदारेश्‍वर मंदिरासमोर तीळगंगा नदीवर "लिथली आर्च' तंत्राद्वारे आधुनिक पद्धतीने बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. जगात विश्वसनीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात येत असलेला आशिया खंडातील हा पहिलाच पूल असल्याचा दावा बांधकाम विभागाने केला आहे. 

कोरेगाव - येथील केदारेश्‍वर मंदिरासमोर तीळगंगा नदीवर "लिथली आर्च' तंत्राद्वारे आधुनिक पद्धतीने बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. जगात विश्वसनीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात येत असलेला आशिया खंडातील हा पहिलाच पूल असल्याचा दावा बांधकाम विभागाने केला आहे. 

आमदार शशिकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे केदारेश्‍वर मंदिरासमोर तीळगंगा नदीवर एक मोठा व एक लहान, असे दोन पूल उभारण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. त्यानुसार, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी या पुलांचे बांधकाम आधुनिक पद्धतीने करण्याचा संकल्प केला होता. जगातील विविध तंत्रज्ञानाच्या अभ्यासाअंती युरोपसह जगात विश्‍वसनीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "लिथली आर्च' तंत्राचे बारकावे तपासून ही पद्धत या ठिकाणी वापरण्याचा निर्णय झाला. त्यानुसार, निविदा प्रक्रियेनंतर "आर्च इन्फ्रा' या ठेकेदार कंपनीने काम मिळवले आणि प्रत्यक्ष पुलाच्या उभारणीस प्रारंभ झाला. 

सध्या हे काम प्रगतीपथावर असून, बांधकाम विभागाच्या पाच जिल्ह्यांतील अभियंत्यांनी या कामाची पाहणी केली. त्यात प्रामुख्याने पुणे येथील मुख्य अभियंता प्रवीण किडे, पुणे प्रदेशचे सहायक मुख्य अभियंता जे. डी. कुलकर्णी, साताऱ्याचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, कोल्हापूरचे सदाशिव साळुंके, सोलापूरचे राजेश पाटील, कार्यकारी अभियंता लक्ष्मण वाघमोडे, संजय सोनावणे, कोरेगावचे उपअभियंता राहुल अहिरे, कनिष्ठ अभियंता राजेंद्र नवाळे आदींचा समावेश होता. श्री. माने व श्री. अहिरे यांनी उपस्थितांना प्रकल्पाची रुपरेषा सांगितली. "आर्च इन्फ्रा' कंपनीतर्फे चेतन पवार व राजू शहाडे यांनी "लिथली आर्च' पद्धतीची माहिती दिली. 

"स्टील'चा वापर न करता हा पूल बांधण्यात येत असून, "आर्च' पद्धतीला सुमारे 120 वर्षांचे आयुष्यमान असल्याचे व अशा कामाला भविष्यात देखभाल दुरुस्तीची आवश्‍यकता राहात नाही. 

राहुल अहिरे, उपअभियंता, बांधकाम विभाग 

Web Title: marathi news Lithley Arch technology koregaon bridge