कर्जाचे आमिष दाखवून त्रिपुरा चिटफंडमध्ये फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

सोलापूर - चिटफंड योजनेत गुंतवणूक करण्यास लावून पाच लाखांचे कर्ज देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर कर्ज देण्यास टाळाटाळ करून फसवणूक केल्याप्रकरणी चौपाड येथील त्रिपुरा चिटफंड कार्यालयातील मॅनेजरसह पाच जणांवर फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सुनील हिरजे, अंबादास वईटला, सचिन पात्रे, योगीराज रागा, बाळकृष्ण बोडा अशी आरोपींची नावे आहेत. अमिन अब्दूल पटेल (वय 30, रा. हौसे वस्ती, आमराई देगाव रोड, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील हिरजे याच्यासह इतरांनी संगनमत करून चौपाड परिसरातील त्रिपुरा चिटफंडच्या कार्यालयात वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या योजना सांगून अमिन पटेल यांना दररोज पाचशे ते एक हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. पाच लाखांचे कर्ज देण्याचे आमिषही दाखविले. त्यानंतर कर्ज देण्यास टाळाटाळ केली. गुंतवणूक केलेली एक लाख नव्वद हजारांची रक्कम परत दिली नाही. हा गुन्हा जानेवारी ते सप्टेंबर 2018 या कालावधीत घडला आहे. आरोपींनी पटेल यांच्यासह इतरांचीही चार लाख 75 हजार दोनशे रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित दिवसे तपास करीत आहेत.

Web Title: marathi news loan fraud chitfund tripura