बालमेळाव्यात रंगले मोठ्यांचे मानापमान नाट्य 

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 27 डिसेंबर 2017

सोलापूर : मुलांसाठी आयोजित केलेल्या बालमेळाव्यात मोठ्यांचे मानापमान नाट्य रंगले. महापालिकेच्या खर्चाने होत असलेल्या या मेळाव्यावर भाजपचा प्रभाव असल्याची टीका समिती विरोधी पक्षाच्या नगरसेविकांनी केली. महापालिकेतील उपेक्षित आणि वंचित मुलांना आनंद घेता यावा, यासाठी दरवर्षी महिला व बालकल्याण समितीच्या वतीने बालमेळाव्याचे आयोजन केले जाते. 

सोलापूर : मुलांसाठी आयोजित केलेल्या बालमेळाव्यात मोठ्यांचे मानापमान नाट्य रंगले. महापालिकेच्या खर्चाने होत असलेल्या या मेळाव्यावर भाजपचा प्रभाव असल्याची टीका समिती विरोधी पक्षाच्या नगरसेविकांनी केली. महापालिकेतील उपेक्षित आणि वंचित मुलांना आनंद घेता यावा, यासाठी दरवर्षी महिला व बालकल्याण समितीच्या वतीने बालमेळाव्याचे आयोजन केले जाते. 

काहीवेळा मुलांच्या आनंदाऐवजी नातेवाईकांची 'सोय' व्हावी, त्यांना 'लक्ष्मीदर्शन' व्हावे, हा देखील हेतू असतो. मात्र, वंचित मुलांना मिळणारा आनंद आणि त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून या बाबींकडे दुर्लक्ष केले जाते. यंदा मात्र या मेळाव्याला राजकीय स्वरुप आले आणि त्यावरून छोट्यांच्या मेळाव्यात मोठ्यांचे मानापमान नाट्य रंगले. 

लिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्यांदाच हा मेळावा होत आहे. त्यामुळे स्वत:हून निमंत्रण पत्रिकेवर भाजपशी संबंधित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नावांची मांदियाळी होती. भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, शिखर बँकेचे संचालक अविनाश महागावकर यांची नावे आहेत. त्यामुळे समितीतील काँग्रेस, शिवसेना आणि एमआयएमच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. 

त्यातच दिवसभर मुलांना फक्त केळी आणि सफरचंद देण्याचे नियोजन केल्याने विरोधक भडकले. आमच्या काळात मुलांसाठी सकाळी नाष्टा, दुपारी जेवण आणि सायंकाळी पुन्हा आईस्क्रिम किंवा तत्सम पदार्थ दिले गेले होते. यंदा तशी व्यवस्था केली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरून डबे करून आणावे लागले, अशी हरकत विरोधकांनी घेतली. 

उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात मंचावर सर्व पक्षाच्या नगरसेविका उपस्थित असताना महापौरांनी फक्त भाजपच्याच नगरसेवक-नगरसेविकांची नावे घेतली. महापालिकेशी संबंधित नसलेल्या व्यक्तीला व्यासपीठावर समोरच्या बाजूला आणि नगरसेविकांना मात्र मागे बसविले अशी तक्रार केली. त्यातच यंदा जेवणाची व्यवस्था नसल्याने काही मुख्याध्यापक-शिक्षकांनीही नाराजी व्यक्त केली. त्यामुळे विरोधकांना भलताच जोर आला त्यांनी थेट मेळाव्यातून बाहेर पडणे पसंत केले. 

Web Title: marathi news local solapur news child camp