देशातील 'सर्वोत्कृष्ट दहा जिल्ह्याधिकार्‍यां'च्या यादीत महाराष्ट्राच्या रोहिणी भाजीभाकरेंचा समावेश

अक्षय गुंड
शनिवार, 23 डिसेंबर 2017

उपळाई बुद्रूक (जि. सोलापूर) : देशाच्या भविष्याची वाटचाल प्रशासकीय अधिकारी यांच्या निर्णयांच्या अमंलबजावणी व कामगिरीवर चालते. नुकतेच "द बेटर इंडिया" या वेबसाईटने संपूर्ण भारतातून प्रशासकीय क्षेत्रातील ज्या अधिका-यांनी देशाच्या हितासाठी व जनतेच्या भल्यासाठी नाविन्यपूर्ण व वेगळे उपक्रम राबवून वर्षभरात सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकार-यांच्या कामाचा आढावा घेतला. यातून 'सर्वात्कृष्ट दहा आयएएस अधिकारी' निवडले. यात महाराष्ट्र राज्याची कन्या आणि तामिळनाडू राज्यातील सेलमच्या जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे-बिदरी यांचा समावेश आहे.

रोहिणी भाजीभाकरे -बिदरी यांचा या 'दहा सर्वात्कृष्ट जिल्हाधिकारी' यात समावेश म्हणजे महाराष्ट्र राज्यासाठी कौतुकास्पद व अभिमानास्पद गोष्ट आहे. सेलम जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून रोहिणी भाजीभाकरे-बिदरी यांनी शाळेत जाऊन लहान मुलांसोबत पंगतीत बसून जेवण करणे, ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या जनता दरबार घेऊन सोडवणे, डेंग्यू रोगाची लागण पहाटेच्या वेळी गावात जाऊन खबरदारीसाठी उपाय सुचवणे तसेच व्हाॅट्सअॅपच्या माध्यामातुन सर्व अधिका-यांच्या संपर्कात राहतात. तसेच सेलम जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्याचा त्यांचा संकल्प असून त्यांची अंमलबजावणी केली आहे. सेलमच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी असल्याने स्थानिक लोकांना त्या 'सेलेब्रेटीपेक्षा' कमी वाटत नाहीत.

भाजीभाकरे यांनी सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते स्वाक्षरी असलेली बॅट देऊन 'स्वच्छता चॅम्पियन' म्हणुन सन्मानित करण्यात आले होते. त्यामुळे नुकत्याच एका "द बेटर इंडीया" वेबसाईटने जाहीर केलेल्या वर्षाभरातील सर्वात्कृष्ट दहा जिल्हाधिकारीमध्ये महाराष्ट्र राज्याची कन्या आणि सेलमच्या जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे-बिदरी यांची निवड झाली असल्याने संपूर्ण राज्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सर्वात्कृष्ट दहा जिल्हाधिकारी
'द बेटर इंडिया" या वेबसाईटने जाहीर केलेले सर्वात्कृष्ट दहा जिल्हाधिकारी:

रोहिणी भाजीभाकरे (तामिळनाडू), प्रसन्नाथ नायर (केरळ), पोमा तुडू (ओडिसा), सुरेंद्रकुमार सोंलकी (राजस्थान), मिर मोहम्मद अल्ली (केरळ), पारिकिपंडला नरहरी (मध्य प्रदेश), भारती होळकरी (तेलगंणा), पीएस प्रद्युम्न (आंध्रप्रदेश), सौरभ कुमार (छत्तीसगढ), रोनाल्ड रोज (तेलंगणा)

Web Title: marathi news Maharashtra news Rohini Bhajibhakare