मंगळवेढ्यातील बोराळे येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन

हुकूम मुलाणी
बुधवार, 24 जानेवारी 2018

मंगळवेढा : लोकसंख्येनुसार निधीचे वाटप करण्याचे धोरण असताना काही पदाधिकारी चूकीच्या पध्दतीने निधी नेऊन पुन्हा याच तालुक्यात येऊन निधी देतो म्हणतात मग आमचा निधी नेलाच का? असा सवाल आ. भारत भालके यांनी जि.प.अध्यक्ष संजय शिंदे यांना केला. तालुक्यातील बोराळे येथे विविध विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. 

मंगळवेढा : लोकसंख्येनुसार निधीचे वाटप करण्याचे धोरण असताना काही पदाधिकारी चूकीच्या पध्दतीने निधी नेऊन पुन्हा याच तालुक्यात येऊन निधी देतो म्हणतात मग आमचा निधी नेलाच का? असा सवाल आ. भारत भालके यांनी जि.प.अध्यक्ष संजय शिंदे यांना केला. तालुक्यातील बोराळे येथे विविध विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी जि. प. सदस्य नितीन नकाते, प. स. सदस्य रमेश भांजे, शशिकांत बुगडे, धनंजय पाटील, बाबासाहेब पाटील, सचिन नकाते, तानाजी पाटील, दयानंद सोनगे, भारत पाटील, मनोहर कवचाळे, नाना पाटील आदी उपस्थित होते
.
 आ. भालके म्हणाले की, नियोजनने विकासाचा निधी वर्ग करूनही निकष डावलून निधी नेणाऱ्यांविरूध्द जि. प.च्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवला तरच तो निधी मिळेल. तो निधी परत आणण्याची जबाबदारी जनतेची नसून लोकप्रतिनिधींची आहे. 

दुष्काळी निधीची मिळावा म्हणून मी विधानसभेत आवाज उठवला महसूल मंत्र्यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर सुध्दा दिले नाही. यासाठी 400 कोटीची मागणी करून केवळ 57 कोटी देऊन शेतकऱ्याची दिशाभूल केली. आत्महत्या थांबव्यात म्हणून हमीभावाच्या केवळ गप्पा मारल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी वाढल्या.
 या भागातील रस्ते दुरुस्तीसाठी पाठपुरावा करून निधी आणला म्हणून नागरिकांनी रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष ठेवावे दर्जेदार रस्ते होत नसल्यास कामे थांबवून माझ्याकडे तक्रार करण्याचे आवाहन आ. भालके केले माझ्याकडे तक्रारी येताच थेट राज्याचे प्रधान सचिव यांच्याकडे तक्रार केली आहे. 

ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी होणार आहे. माझ्या निधीतून हायमास्ट दिवे देणार असून कार्यकर्त्यांनी आपले घर उजेडात आणण्याऐवजी सार्वजनिक ठिकाणे उजेडात आणावीत. हरित लवादाच्या जाचक अटीमुळे जिल्ह्यातील वाळू लिलाव ठप्प असून वाळूअभावी बांधकामे बंद आहेत त्यामुळे निधी परत जाणार नाही. याची अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. 

 

Web Title: Marathi news mangalwedha news development work