मंगळवेढ्यात कडक पोलिस बंदोबस्त

हुकूम मुलाणी
बुधवार, 3 जानेवारी 2018

मंगळवेढा -  कोरेगाव भिमा येथे शौर्य दिनानिमित्त जमलेल्या बौद्ध समाज बांधवावर झालेल्या दगडफेकीचा निषेध करून यामध्ये जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करुन झालेली नुकसान भरपाई वसुल करावी, या मागणीसाठी मंगळवेढ्यात कडकडीत बंद  पुकारण्यात आला आला होता. यामध्ये भारीप बहुजन महासंघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, संभाजी बिग्रेड, प्रहार संघटना शेतकरी संघटना  व अन्य संघटनेने या बंद मध्ये सहभाग घेतला होता.

आज सकाळपासून दुकाने व बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. मुख्य बाजारपेठेत, चौकात शुकशुकाट होता. या बंदची माहिती नसल्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या भाजी विक्रेत्यांची गैरसोय झाली. बाहेरगावी मुक्कामास गेलेल्या बसेस आगारात आल्यावर बससेवा ही बंद ठेवण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे व पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी चौका-चौकात पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी यांना या संघटनेने निवेदन दिले असून घटनेत दोषी असणाऱ्या संघटनांवर कारवाई करावी व घटनेकडे दुर्लक्ष करणाऱ्याला जिल्हा पोलिस प्रमुखावर ही कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात नमूद केली होती. या निवेदनावर धनाजी सरवदे, लक्ष्मण गायकवाड,पंकज पाराध्ये, समाधान हेंबाडे, समाधान क्षिरसागर, सिध्दार्थ लोकरे, मच्छीद्र भोसले, अॅड. राहूल घुले, अजय कांबळे, बाळासाहेब वाघमारे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Web Title: Marathi news Mangavedha Koregaon Bhima Police Protection