इचलकरंजीत शिवसेनेतर्फे वाढीव वीज बिलांची होळी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

इचलकरंजी : यंत्रमाग उद्योगासाठी पुन्हा वीज दरवाढ करण्यात आली आहे. त्याच्या निषेधार्थ शहर शिवसेनेच्या वतीने शनिवारी महावितरण कंपनीवर मोर्चा काढण्यात आला. या वेळी वीज बिलांची होळी करून शंखध्वनी करीत दरवाढीचा निषेध करण्यात आला. या वेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता शिंदे यांना निवेदन देऊन वीज दरवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. 

यंत्रमाग उद्योगास सवलतीच्या दरात वीजपुरवठा केला जातो. मात्र जुलै महिन्याची वाढीव दराने बिले आहेत. त्यामुळे यंत्रमाग उद्योगांना मोठा फटका सहन करावा लागला आहे. मुळात यंत्रमाग उद्योग विविध कारणांमुळे अडचणीत असताना वीज दरवाढीमुळे हा उद्योग उद्‌ध्वस्त होण्याची भीती आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ही वीज दरवाढ रद्द करावी, अशी मागणी करीत आज शहर शिवसेनेच्या वतीने आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते. 

शहर शिवसेना कार्यालयापासून मोर्चास सुरवात झाली. महावितरणचे प्रवेशव्दार बंद करण्यात आल्यामुळे शिवसैनिकांनी महावितरण कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना रोखून धरले. त्यामुळे पोलिस व शिवसैनिक यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर कार्यकारी अभियंता शिंदे हे मोर्चेधारकांसमोर येऊन निवेदन स्वीकारले. आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, शहर प्रमुख सयाजी चव्हाण, माजी नगरसेवक मलकारी लवटे, महेश बोहरा, आनंदा शेट्टी, धनाजी मोरे, विजय जोशी, शिवाजी पाटील, संतोष गौड, राजू आग्रे, अजित पाटील, उमेश पाटील, आण्णा बिल्लुरे, सचिन खोंद्रे, नितीन कुगे आदी सहभागी झाले होते.

Web Title: marathi news marathi website Ichalkaranji Shiv Sena