कऱ्हाडमध्ये पिसाळलेल्या श्‍वानांचा त्रास 

सचिन शिंदे
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

कऱ्हाड : पिसाळलेल्या श्‍वानाने शहरात चौघांचा चावा घेतला. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. 

भाजी मंडई परिसरात आज (शुक्रवार) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. श्‍वानाने चावा घेतलेल्या व्यक्तींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

शहरातील मूळ गाव भाग आणि वाढीव हद्दवाढ भागात प्रत्येक गल्लीत किमान 25 कुत्र्यांचा कळप आहे. रात्री उशीरा येणाऱ्यांना या कळपांतील कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतो. आता दिवसाढवळ्याही या मोकाट कुत्र्यांचा त्रास होताना दिसत आहे. 

'पालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा' अशी मागणी केली जात आहे; मात्र त्याकडे फारसे लक्ष दिले गेलेले नाही. 'दक्ष कऱ्हाडकर' या गटाने यासंदर्भातील निवेदन पालिकेला दिले आहे. त्याची दखलही पालिकेने घेतलेली नाही. निर्बिजिकरणासह अन्य उपाय राबवून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Web Title: marathi news marathi websites Satara News Stray Dogs