अक्कलकोट तालुक्याची वरदायिनी कुरनुर अखेर ओव्हरफ्लो

राजशेखर चौधरी
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

अक्कलकोट : कुरनुर ता.अक्कलकोट येथील धरण हे आज अखेर फुल्ल झाले असून तालुक्याच्या ४० हुन अधिक बोरीनदी काठच्या  गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या आणि नदीकाठच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.

कुरनुर येथील धरण काल रात्री नळदुर्ग, इटकळ आदी भागातील पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने १०० टक्के भरलेला आहे.याची क्षमता ८२२ दशलक्ष घनफुट इतकी आहे. धरणाचे तीन दरवाजे आज सकाळी उघडून ४५० क्यूसेक्स प्रतिसेकंद इतके पाणी सध्या सोडले जात आहे.

पाण्याचा प्रवाह पाठीमागे जास्त असल्याने जेवढे पाणी वरून येत आहे तेवढे खाली सोडले जात आहे. यामुळे या खालचे सांगवी, संगोगी व बबलाद यासह खालील बंधारे या पाण्याने भरले जातील आणि शेतकरी व नागरिकांची पाण्याची सोय होईल.

यावर्षीचा संपूर्ण पावसाळा संपत आला होता पण धरणाची पातळी ३० ते ३५ टक्क्यांच्या वर जात नव्हते. यामुळे या धरणावर अक्कलकोट शहर,मैंदर्गी व दुधनी या नगरपरिषदांसह नदी काठच्या गावांचा पाणी पुरवठा अवलंबून असल्याने जास्त चिंता व्यक्त केली जात होती. पण आज अखेर धरण पूर्ण भरून त्यातून पाणी सोडल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: marathi news marathi websites Solapur News Akkalkot