मटका अन्‌ गुटख्याला सोन्याचे दिवस!

संजय जगताप
शनिवार, 24 मार्च 2018

मायणी - बेरोजगारीमुळे मायणीसह परिसरातील नागरिक मटक्‍याकडे आकर्षित होत आहेत. आरोग्यास घातक असलेला व शासनाने बंदी घातलेला गुटखाही येथे विकला जात आहे. त्यामुळे मटका व गुटख्याला सोन्याचे दिवस आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या दारूबंदी आदेशाचाही येथे फज्जा उडाला आहे.

व्यसनाधिनतेत वाढ होऊन अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त होऊ लागलेत. त्याकडे पोलिसांचा कानाडोळा होत असून विविध सामाजिक संस्था व पालकांचेही दुर्लक्ष होत आहे.  

मायणीसह परिसरात ठिकठिकाणी मटक्‍याचे एजंट आहेत. त्यांनी या भागातील गावोगावी मटका बुकिंगसाठी जाळे पसरवले आहे.

आधुनिक पद्धतींचा वापर करत मोबाईलवर मटका घेतला जात आहे. दुष्काळी स्थिती व बेरोजगारीमुळे मायणी, कलेढोण, कातरखटाव, चितळी आदी मोठ्या गावांतील तरुण मोठ्या संख्येने अवैध धंद्याकडे वळत आहेत. परिणामी मटका, जुगारासह मांडुळाची तस्करी, बेकायदा दारूविक्री, वाळूची चोरटी वाहतूक करण्याच्या धंद्यात अनेक तरुण गुरफटलेले दिसतात. खेड्यापाड्यातून अनेक जण कामाला जातो म्हणून सांगून येथे दिवसभर मटका खेळत असल्याचे किस्सेही कानावर येत आहेत. 

पोलिस विभागाकडून दुर्लक्ष
काळ्या धंद्यांवर पोलिसांचा हवा तेवढा पहारा नाही. दोषींवर तोंडदेखली कारवाई करून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम पोलिस करीत आहेत. सहायक पोलिस उपनिरीक्षक संतोष गोसावी यांनी येथे हजर होताच दारूबंदीसह विविध काळ्या धंद्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली. मात्र, आठवड्यातच त्यांनी मोहीम गुंडाळली. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे, कारवाईचा फार्स करण्याने दिवसेंदिवस काळ्या धंद्यात येथे वाढच होताना दिसते. पोलिसांना त्याबाबत सर्व काही माहीत असूनही कधी राजकीय दबावाने, तर कधी अर्थपूर्ण संबंधामुळे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी परिसरातील अशा स्वरूपाच्या बेकायदा व्यवसायांवर, काळ्या धंद्यांवर करडी नजर ठेवावी. कायद्याचा धाक निर्माण करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

बेकायदेशीर धंदे जोमात
आरोग्यास घातक असलेल्या गुटख्यावर बंदी असतानाही सर्रास गुटखा विकला जात आहे. मटका व गुटखा विक्रेते, एजंटना राजाश्रय असल्याने बिनदिक्कत कोणालाही न जुमानता ते धंदा करीत आहेत. पोलिसही त्यांच्यावर कारवाईला धजत नसल्याची चर्चा आहे. मटका व गुटख्याचा धंदा येथे जोमात सुरू असून, बेकायदा दारूविक्रीतही वाढ झाली आहे. परिसरातील गावोगावचे लोक येथील विविध हॉटेल, ढाब्यांवर मद्यपानासाठी येत आहेत. यात्रा-जत्रांमुळे त्यात आणखी भरच पडत आहे. परिणामी काळे धंदेवाल्यांची लाखोंची कमाई होत आहे.

Web Title: marathi news mayani news matka gutkha police