मोहोळ येथे फिल्टर युक्त पाणपोई सुरु

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

मोहोळ येथे फिल्टर युक्त थंड पाण्याची पाणपोई सुरू करण्यात आली असून तीचे उद्घाटन मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या हस्ते करण्यात आले. 

मोहोळ - पेनुर ता. मोहोळ येथे शिवसेना व चरणराज चवरे मित्र मंडळाच्या वतीने फिल्टर युक्त थंड पाण्याची पाणपोई सुरू करण्यात आली असून तीचे उद्घाटन मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या हस्ते करण्यात आले. 

पंढरपूर मोहोळ हा अत्यंत रहदारीचा राज्य मार्ग आहे. पेनुर येथे पापरी, खंडाळी, पाटकुल, कोन्हेरी या गावातील नागरीकांना पंढरपूर व सोलापुर येथे जाण्यासाठी या ठिकाणी यावे लागते. दररोज या ठिकाणाहून शाळकरी विध्यार्थी व्यापारी शेतकरी, बँक अधिकारी यांची ये जा असते. पाणपोई ही बसस्थानकाच्या जवळच असल्याने याचा मोठा लाभ नागरीकांना होणार आहे. यावेळी मस्के म्हणाले, सध्या अशा सामाजिक उपक्रमाची गरज असून चरणराज यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे. 

दररोज पस्तीस थंड पाण्याचे जार या ठिकाणी ठेवण्यात येणार असून गरज लागली तर आणखी त्यात वाढ करण्यात येणार असल्याची माहिती हिंदवीर या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष चरणराज चवरे यांनी दिली. या ठिकाणी स्वच्छतेला मोठे महत्व दिले आहे. यावेळी माजी सरपंच देवीदास चवरे, गंगाधर चवरे, दतात्रय सावंत, छगन जाधव, नामदेव माळी, विठ्ठल माने, सागर चवरे, सुहास चवरे, सज्जन रणदिवे, संतोष चव्हाण आदींसह अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mohol filter water panapoi