'धनशक्तीचे' आक्रमण शिक्षकांनी रोखावे: प्रा. भाऊसाहेब कचरे

हरिभाऊ दिघे
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

शिक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण टीडीएफतर्फे निवडणूक लढवीत आहोत. ज्यांना शिक्षकांच्या प्रश्नांचे देणेघेणे नाही, असे शिक्षक नसलेले धनदांडगे लोक शिक्षक मतदार संघावर आक्रमण करू लागले आहेत. त्यांनी आपली काही मंडळी साथ देत आहे, त्यांचा हेतू शिक्षक मतदारांनी तपासावा.

तळेगाव दिघे (जि. नगर) : "शिक्षक नसलेले लोक धनशक्तीच्या जोरावर शिक्षक मतदार संघाच्या जागा बळकावयला निघाले आहेत. शिक्षकांच्या प्रश्नांशी बांधिलकी नसणाऱ्या थारा देता कामा नये. धनशक्तीचे आक्रमण शिक्षकांनी रोखावे," असे प्रतिपादन नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातील महाराष्ट्र टीडीएफचे उमेदवार प्रा. भाऊसाहेब कचरे यांनी केले.

संगमनेर ( जि. नगर ) तालुक्यातील तळेगाव दिघे येथे नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रचारार्थ बैठकीत ते बोलत होते. उपप्राचार्य संपतराव मुळे, चंद्रभान हापसे, शिवाजी दिघे, संजय दिघे, प्रताप जोंधळे, भागवत दिघे, रामहरी भागवत, बाबासाहेब दिघे, कैलास गिरी, राजेंद्र सातपुते, बाबासाहेब गागरे, बी. एस. फटांगरे, संजय डोंगरे, बाबा जगताप, अशोक ढवळे, सुनील दिघे, राम गायकवाड, भूषण जाधव उपस्थित होते.

प्रा. कचरे म्हणाले, शिक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण टीडीएफतर्फे निवडणूक लढवीत आहोत. ज्यांना शिक्षकांच्या प्रश्नांचे देणेघेणे नाही, असे शिक्षक नसलेले धनदांडगे लोक शिक्षक मतदार संघावर आक्रमण करू लागले आहेत. त्यांनी आपली काही मंडळी साथ देत आहे, त्यांचा हेतू शिक्षक मतदारांनी तपासावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत शिक्षकांसाठी वेगळा आमदार हा 'विशेषाधिकार' दिला आहे. मात्र धनसत्तेच्या जोरावर शिक्षक नसलेली मंडळी शिक्षक आमदारकीची जागा बळकावू पाहत आहेत. अशा धनदांडग्यांना शिक्षकांनी रोखावे व या निवडणुकीत शिक्षकांनी आपल्याला साथ द्यावी, असे आवाहन प्रा. कचरे यांनी केले. प्रास्ताविक चंद्रभान हापसे यांनी केले. सूत्रसंचालन संजय दिघे यांनी केले. प्रताप जोंधळे यांनी आभार मानले.

Web Title: Marathi news Nagar news bhausaheb kachre statement