संगमनेर: विषारी औषध पोटात गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

हरिभाऊ दिघे
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

तळेगाव दिघे येथील लक्ष्मण उर्फ मोठ्याभाऊ भिकाजी दिघे हे रविवारी ( दि. २४ ) पहाटेच्या सुमारास शेतातील डाळींब बागेस बुरशीनाशक व कीटकनाशक औषधांची फवारणी करण्यासाठी गेले होते. दरम्यान विषारी औषध पोटात गेल्याने त्यांना विषबाधा झाली.

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे डाळींब बागेस औषध फवारणी दरम्यान एका शेतकऱ्याच्या पोटात विषारी औषध गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. लक्ष्मण उर्फ मोठयाभाऊ भिकाजी दिघे ( वय ५२ ) असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

याबाबतची माहिती अशी : तळेगाव दिघे येथील लक्ष्मण उर्फ मोठ्याभाऊ भिकाजी दिघे हे रविवारी ( दि. २४ ) पहाटेच्या सुमारास शेतातील डाळींब बागेस बुरशीनाशक व कीटकनाशक औषधांची फवारणी करण्यासाठी गेले होते. दरम्यान विषारी औषध पोटात गेल्याने त्यांना विषबाधा झाली. सकाळी सात वाजेच्या सुमारास हा प्रकार लक्षात आला. त्यांनतर तातडीने त्यांना संगमनेर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी रुग्णालयाच्या खबरीनुसार संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत लक्ष्मण उर्फ मोठ्याभाऊ दिघे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेने तळेगाव दिघे येथे शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Marathi news Nagar news farmer dead for pesticide