कारागृहात जाण्यासाठी तो करतो असे 'उद्योग'

Nagar
Nagar

नगर : "कोपर्डी प्रकरणातील आरोपींना नागपूरच्या कारागृहात नको, तर पुण्यातील येरवडा कारागृहात न्या, तेथेच ते सुरक्षित राहतील'' असा नगर जिल्हा कारागृह अधिक्षकांना दुरध्वनी करणाऱ्या करणाऱ्या तोतयाला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अमित जगन्नाथ कांबळे (वय 21, रा. नवीपेठ, निंबाळकरवाडा, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

"किडणीचा आजार आहे, कारागृहात राहिल्यावर मोफत उपचार होतात, पंधरा दिवसापुर्वी कारागृहातून सुटल्यानंतर पुन्हा कारागृहात जाण्यासाठी त्याने हा फोन केला असल्याची रंजक माहिती त्याने दिली आहे. याआधीही पुण्यात असे अनेक फोन केले असून 2010 पासून सतत अटक होऊन कारागृहात जात आहे'' असे अटक केलेल्या तरुणाने सांगितले असल्याचे पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा म्हणाले.

राज्यभर गाजलेल्या कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन खून केलेल्या खटल्यातील गुन्हेगार जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने 29 नोव्हेंबरला फाशीची शिक्षा सुनावली. अन्य बाबी पूर्ण होईपर्यंत आरोपींना न्यायालयातून जिल्हा कारागृहात नेण्यात आले होते. त्याच दिवशी अज्ञात व्यक्तीने सायंकाळी सहा व आठ वाजता दोन वेळा कारागृहात दूरध्वनी केला. सुरवातीला मुख्यमंत्र्यांचा खासगी पीए कुलकर्णी, नंतर पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्ये बोलत असल्याचे सांगितले होते. "कोपर्डी खटल्यातील आरोपींना फाशी झालेली असताना, त्यांना नगरच्या कारागृहात का ठेवले? आरोपींना नागपूरला न नेता पुण्याला येरवडा कारागृहात न्यावे. ते नागपूरला नव्हे, तर येरवड्यात सुरक्षित राहतील', असे दूरध्वनीवर बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले होते. कारागृह अधिक्षकांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कारागृहात फोन करणारी व्यक्ती पुण्यातील असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांना माहिती देऊन आणि पोलिस उपनिरिक्षक श्रीधर गुट्टे, फकीर शेख, दत्ता हिंगडे, रवी सोनटक्के, संदीप घोडके, सचीन कोळेकर, देवा काळे यांचे पथक नेमून पुण्यात पाठवले. नगर- पुणे रस्त्यावरील बेलवंडी फाट्यावर संशयित अमित कांबळे याला पाहिले. पकडण्याचा प्रयत्न केला असता पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याला पाठलाग करुन पकडले.

त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून अनेक रंजक बाबी समोर आल्या आहेत. कांबळेला किडणीचा आजार आहे. दर तीन-चार दिवसाला डायलेसीस करावे लागते. घरची परिस्थिती हालाखीची असून उपचार घेणे शक्‍य नाही. कारागृहात गेल्यावर उपचार मिळतात. त्यामुळे तो असे फोन करतो. याआधी त्याने पुण्याचे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग यांनाही दुरध्वनी करुन धमकी दिली होती. याशिवाय इतरही अनेक बाबीत असे दुरध्वनी करुन धमकावतो. 2010 पासून तो वेगवेगळ्या कारणाने कारागृहात आहे. आता पंधरा दिवसापुर्वीच तो कारागृहातून बाहेर आला होता. पोलिसांनी त्याला जामीनाबाबत विचारल्यावर "जमीन नको असल्याचे त्यांने सांगितले' असे पोलिस निरिक्षक निरिक्षक दिलीप पवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com