शेतात बिबट्या आजारी अवस्थेत आढळला 

सनी सोनावळे
बुधवार, 10 जानेवारी 2018

टाकळी ढोकेश्वर (नगर) : कर्जुले हर्या (ता. पारनेर) येथील मांडओहळ धरण रस्त्यावरीत उसाच्या शेतात आज (ता. 09) आजारी अवस्थेत बिबट्या आढळून आला. याबाबत वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी येऊन शिताफीने बिबट्याला जेरबंद केले. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गावातील मांडओहळ धरण रस्त्यावरील कमलजाई मळ्यात शरद उंडे यांची ऊस शेती आहे. आज दुपारी एकच्या सुमारास उंडे हे शेतामध्ये गेले होते. त्यावेळी त्यांना बिबट्या दिसला. ऊसात बिबट्या असल्याचे निदर्शनास आल्यानंतर उंडे शेतामधून बाहेर पडले. त्यांनी याबाबतची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.

टाकळी ढोकेश्वर (नगर) : कर्जुले हर्या (ता. पारनेर) येथील मांडओहळ धरण रस्त्यावरीत उसाच्या शेतात आज (ता. 09) आजारी अवस्थेत बिबट्या आढळून आला. याबाबत वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी येऊन शिताफीने बिबट्याला जेरबंद केले. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गावातील मांडओहळ धरण रस्त्यावरील कमलजाई मळ्यात शरद उंडे यांची ऊस शेती आहे. आज दुपारी एकच्या सुमारास उंडे हे शेतामध्ये गेले होते. त्यावेळी त्यांना बिबट्या दिसला. ऊसात बिबट्या असल्याचे निदर्शनास आल्यानंतर उंडे शेतामधून बाहेर पडले. त्यांनी याबाबतची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच नगर येथील उपवनसंरक्षण अधिकारी ए. लक्ष्मी, ए. बी. कोकाटे, वनक्षेत्रपाल किसन आगलावे, संजय कडु, बी. बी. मुरूमकर, बी. एम. भांड यांनी काही अंतरावरूनच बिबट्याच्या हालचालींचे निरीक्षण केले. त्यावेळी बिबट्या आजारी आणि उपाशीपोटी असल्याचे वनाधिकाऱ्यांना जाणवले. वनाधिकाऱ्यांनी शिताफीने त्याला पकडून पिंजऱ्यामध्ये घातले. परिस्थिती गंभीर असल्यामुळे तातडीने बिबट्याला जुन्नर येथील बिबट उपचार व निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे.

 

Web Title: Marathi news nagar news leopard found in farm