न्यायालय परिसरात एक मराठा, लाख मराठा घोषणा

maratha
maratha

नगर - देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने आज (बुधवार) फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालय परिसरात मराठा संघटनांकडून एक मराठा, लाख मराठा घोषणा देण्यात आल्या.

कोपर्डीतील शाळकरी मुलीवर बलात्कारानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून या मुलीच्या न्यायासाठी मराठा क्रांती मूक मोर्चे निघाले होते. त्यामुळे, या निकालाकडे देशाचे लक्ष होते. अखेर या निकालामुळे पीडितेला अखेर न्याय मिळाला, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.

मराठा संघटनांकडून या निकालाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. न्यायालय परिसरात मराठा संघटनाची घोषणाबाजी करत एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा दिल्या. पीडितेच्या आईनेही मराठा संघटनांचे आभार मानले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com