नगर: आगीत दीड एकर ऊस जळून खाक; मुलगी जखमी

करण नवले
शनिवार, 20 जानेवारी 2018

खोकर शिवारातील बाळासाहेब भणगे यांच्या उसाला तोड चालू असताना अचानक उसाला आग लागली. त्यामुळे बाळासाहेब यांचा दीड एकर उस व उस तोडणी कामगाराचा ट्रक्टर आणि गोरक्षनाथ गंगाधर भणगे, नामदेव सोन्याबापू भणगे यांचा पाच एकर उस जळाला. ट्रक्टर वर बसलेली उस तोडी मजुराची मुलगी भाजल्याने तिला येथील साखर कामगार उपचारासाठी दाखल करण्यात आले.

श्रीरामपूर : तालुक्यातील खोकर शिवारात बाळासाहेब गंगाधर भणगे यांच्या गट नं ४७ मधील उसाला तोड चालू असताना अचानक आग लागली. आगीत दीड एकर ठिबक सह ऊस तसेच शेजारील पाच एकर ऊस व उस तोडणी साठी आलेला ट्रक्टर जळाला. ट्रॅक्टर वरील एक अडीच वर्षाची मुलगी भाजल्याने जखमी झाली आहे. उसाला आग कशामुळे लागली याचे कारण मात्र समजले नाही.

खोकर शिवारातील बाळासाहेब भणगे यांच्या उसाला तोड चालू असताना अचानक उसाला आग लागली. त्यामुळे बाळासाहेब यांचा दीड एकर उस व उस तोडणी कामगाराचा ट्रक्टर आणि गोरक्षनाथ गंगाधर भणगे, नामदेव सोन्याबापू भणगे यांचा पाच एकर उस जळाला. ट्रक्टर वर बसलेली उस तोडी मजुराची मुलगी भाजल्याने तिला येथील साखर कामगार उपचारासाठी दाखल करण्यात आले. आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही.  अशोक कारखाना व श्रीरामपूर नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने आग विझवली .    

Web Title: Marathi news Nagar news sugarcane fire

टॅग्स