फलटण - आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने विजय तुकाराम हुंबे सन्मानित

संदिप कदम
मंगळवार, 6 मार्च 2018

फलटण (सातारा) :  जिल्हा परिषद सातारा मार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची ग्रामीण स्तरावर प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याने आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने विजय तुकाराम हुंबे यांना सन्मानीत करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणार विविध पुसस्काराचे वितरण नुकतेच झाले. यावेळी सन 2016-17 च्या आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी सुरवडी (ता.फलटण) याठिकाणी सेवेत असलेले ग्रामसेवक विजय तुकाराम हुंबे यांनी निवड करण्यात आली होती. त्यांची कर्तव्यतत्परता, स्वयंशिस्त, समन्वय, सहकार्यवृत्ती, सकारात्म दृष्टीकोन, ध्येयाशी प्रामाणिक राहणारी वृत्ती, कल्पकता व उपक्रमशीलता याद्वारे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी गौरवास्पद कामगिरी केली आहे. त्याच्या या कार्याचा उचित सन्मान म्हणून त्यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे यांचे हस्ते देण्यात आला . यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. याबद्दल त्यांचे  शासकीय, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

Web Title: Marathi news phaltan news award gramsevak