आदर्श प्राथमिक शाळेस आयएसओ मानांकन प्रेरणादायी - अॅड. सदाशिवराव पाटील

प्रताप मेटकरी
मंगळवार, 2 जानेवारी 2018

सांगली : आदर्श प्राथमिक शाळा ही जिल्ह्यातील आदर्श शाळा म्हणून नावारूपास आली आहे. मी ज्या उद्देशाने शैक्षणिक संस्थाचा डोलारा उभा केला. त्या संस्थांना मानाचे असे मानांकन मिळाल्याचा खूप मोठा आनंद आहे. आदर्शचे संस्थेतील पहिले रोपटे म्हणून 1996 साली प्राथमिक शाळेचा पाया घातला गेला. तीच संस्था जिल्यातील आदर्श संस्था म्हणून नावारूपास आली याचा मला सार्थ अभिमान आहे. या यशामध्ये संस्था प्रशासन, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या अविरत योगदानामुळेच मानांकन मिळाले आहे, असे प्रतिपादन माजी आमदार अॅड. सदाशिवराव पाटील यांनी केले.

विटा येथील आदर्श प्राथमिक विद्यामंदिरास आयएसओ. मानांकन 9001 च्या प्रमाणपत्र प्रदान सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी यशगुरु टेक्नोलॉजी सातारचे सुनील मोरे, माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील, उपाध्यक्ष ज्ञानोबा देवकाते, कार्यकारी संचालक पी. टी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

अॅड. वैभव पाटील म्हणाले, "शाळेच्या उपक्रमाबरोबरच मुख्याध्यापक व शिक्षकांचे योगदान आहे. आपली शाळा ही आपला परिवार मानून सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले. त्याचे हे यश आहे. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष हसबे यांनी केले. यावेळी जेष्ठ नेते गंगाधर लकडे, सलीम तांबोळी, माजी उपनगराध्यक्षा रंजना बाबर, माजी नगरसेविका लता मेटकरी, नगरसेविका प्रतिभा चोथे, ब्रम्हदेव बाबर, माजी सभापती अविनाश चोथे, प्रकाश निकम, बापू वरुडे, प्रकाश भिंगारदेवे यांच्यासह सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते. "आमच्या शाळेत उपलब्ध असणाऱ्या भौतिक सुविधा, गुणवत्ता निकष, पालकांचा अभिप्राय, गुणवत्तावाढीसाठी केलेले विशेष प्रयत्न, शाळा प्रशासन, विद्यार्थी हित, पालकांचा दृष्टीकोन, संस्कारक्षम, पालक-विद्यार्थी वर्गासाठी उपक्रम, यासह अनेक बारीक-सारीक निकषात आमची शाळा बसल्यामुळे आम्हास मानांकन मिळाले. सांगली जिल्ह्यातील खाजगी तत्वावरील मानांकन मिळणारी पहिली शाळा आहे. हे यश सर्वांचे आहे. यापुढील काळात सुद्धा शाळा हा दर्जा टिकवून ठेवू.", असे मत शाळेचे मुख्याध्यापक संतोष हसबे यांनी मांडले.   

Web Title: Marathi news sangali news iso nomination to adarsh primary school