कृष्णा नदीत आढळले स्त्री अर्भक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

कृष्णा नदी पात्रात मृतावस्थेतील स्त्री अर्भक आढळले आहे.

सांगली - कृष्णा नदी पात्रात माई घाट परिसरात आज सकाळी सातच्या सुमारास मृतावस्थेतील स्त्री अर्भक आढळले. स्थानिकांनी पोलिसांना याबाबत कळवले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. साधारण सहा महिन्यांची पूर्ण वाढ झालेले ते अर्भक नाळेसह तरंगत होते. रोज पोहोणाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला. काहींच्या मते दोन दिवसांपासून ते तरंगत होते. मात्र त्याकडे एखादी बाहुली असावी, असे समजून सर्वांनी दुर्लक्ष केले. आज सकाळी रंग काळा-निळा पडल्याने शंका बळावली. त्यानंतर काहींनी पुढे होऊन ते नदीकाठावर आणले. गावभागातील विसावा मंडळाचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी पुढाकार घेऊन पोलिसांनी कळवले. त्यांनी ते उत्तरीय तपासणी शासकीय रूग्णालयात नेले. याबाबत सर्वंकष चौकशी केली जाईल, असे निरीक्षक रवींद्र शेळके यांनी सांगितले. 

Web Title: marathi news sangli new born baby found dead