ट्रकखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

संदिप कदम
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

फलटण (सातारा) : येथील पृथ्वी चौकात सकाळी नऊच्या सुमारास ट्रकखाली सापडून साहेबराव आण्णा राऊत (वय ६३, रा. लक्ष्मीनगर, फलटण) यांचा जागीच मृत़्यु झाला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक (एमएच-४५-००७८) पृथ्वी चौकातून नाना पाटील चौकाकडे जात होता. यावेळी मोटारसायकल क्रमांक एम. एच. 11 सी. 8853 वरून जात असलेले साहेबराव राऊत हे ट्रकखाली सापडले. यात त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला. पोलिसांनी अपघातग्रस्थ वाहने ताब्यात घेतली असून राऊत यांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे.

Web Title: Marathi news satara news accident man dies

टॅग्स