अचानक लागलेल्या आगीमुळे गवत जाळून खाक

जयभिम कांबळे
गुरुवार, 8 मार्च 2018

तळमावले (सातारा ) : गुढे (ता.पाटण) येथील डोंगरांमध्ये अचानक लागलेल्या आगीमुळे सर्व गवत जाळून खाक झाले आहे. हा आगीचा वणवा नैसर्गिकरित्या लागला की कोणी हा वणवा मुद्दाम पेटवला आहे यामुळे पुन्हा एकदा डोंगर वणव्याचा प्रश्न समोर आला आहे. 

ऐन उन्हाळा जवळ असताना वणवा पेटणे अशा घटना वारंवार घडतात पण काही वेळा आशा घटना काही समाजकंटक घडवून आणून निसर्गाची हानी करत असल्यामुळे यांच्यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. अचानक लागलेली आग ही कुठपर्यंत पसरेल याचा अंदाज येत नसल्याने काही वेळा याचा फटका मानवी वस्तीला ही होऊ शकतो. अशा वणव्यामुळे प्राणी जीवांचा अतोनात जीव जातो. पर्यावरणाची हानी होते. जे कोणी समाजकंटक असे दुष्कृत्य करत असतील त्यांच्यवर कारवाई झाली पाहिजे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

Web Title: Marathi news satara news fire