प्रजासत्ताक दिनापूर्वी विस्थापितांना सुविधा द्या; अन्यथा..: स्वाभिमानी शेतकरी संघटना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

कऱ्हाड : कण्हेर धरणासाठी 40 वर्षांपूर्वी विस्थापित झालेल्या वाघेश्‍वर, चिंचणी, पिंपरी, कवठे, केंजळ गावांतील ग्रामस्थांना शासनाने आवश्यक त्या सोयी-सुविधा दिलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा मोठी गैरसोय होत असून शासनाने प्रजासत्ताक दिनापूर्वी या सुविधा न दिल्यास प्रजासत्ताक दिनी सरकारचा दहावा घालून मुंडन आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे व पदाधिकाऱ्यांनी आज प्रांत कार्यालयात निवेदनव्दारे दिला. 

येथील प्रांताधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार अरुण निकम यांना निवेदन देण्यासाठी वाघेश्‍वर, चिंचणी, पिंपरी, कवठे, केंजळ या गावातील ग्रामस्थांसह अनिल घराळ, प्रमोद जगदाळे, रोहीत पाटील व संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनातील माहिती अशी : धरणासाठी पुनर्वसित झालेल्या गावांना 18 नागरी सुविधा मिळालेल्या नाहीत. चाळीस वर्षांपासून या पुनर्वसित गावचे मूलभूत प्रश्‍न सुटलेले नाहीत. त्यामध्ये जमिनीशेजारी कॅनॉल असून शेतीला पाणी मिळत नाही. गावाची महसूल दरबारी नोंद नाही, मतदार यादीत नावे आहेत. प्लॉटच्या नोंदी नाहीत.

प्रकल्पग्रस्त असून मुलांना नोकऱ्र्या नाहीत, पुनर्वसनात मिळालेली जमीन ही पुन्हा रेल्वेच्या दुपदरीकरणात जाणार आहेत. कारण ती जमीन पूर्वीपासून रेल्वेने संपादित केलेली होती. अगोदर संपादित केलेल्या जमिन या लोकांना देऊन शासनाने त्यांची फसवणूक केली आहे. जमिनीची पुनर्मोजणी न झाल्याने हद्दी समजून येत नाहीत आदि समस्यांचा समावेश आहे. त्यासंदर्भात वारंवार निवेदन देऊनही शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्या सुविधा 26 जानेवारीच्या आगोदर नाही मिळाल्यास सरकार विरोधात 26 जानेवारीलाच आंदोलन करण्यात येईल.

Web Title: marathi news Satara News Kanher Dam Swabhimani Shetkari Sanghatana