कोयना धरणातून उद्यापासून पाणी सोडणार

सचिन शिंदे
शुक्रवार, 28 जुलै 2017

कर्‍हाड:  कोयना धरणाच्या पाणलोट पडणाऱ्या पावसामुळे जलाशयातील पाणीसाठा नियंत्रीत ठेवणेसाठी कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातुन उद्यापासून (शनिवार) दोन हजार १०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय कोयना धरण व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यामुळे कोयना काठच्या जनतेला सावधानतेचा इशारा तहसिलदार रामहरी भोसले यांनी दिला आहे.

पावसाचे प्रमाण असेच वाढके राहिल्यास एक ऑगस्टपासून धरणाचे सहाही वक्र दरवाजे उघडण्यात येतील, असेही व्यवस्थापनाने जाहीर केले आहे. कोयना धरणाचा पाणीसाठा ८०.३३ टीएमसी झाला आहे.

गेल्या चोवीस तासात कोयनानगरला  ७४ (३०९४),  नवजाला ८२ (३४०१) व महाबळेश्वरला ४१ (२८९६) मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरणाची एकुण पाणीपातळी २१४१.०६ फुट झाली आहे. पाणीसाठा १.१९ टीएमसीने वाढला आहे. कोयना जलाशयात प्रतिसेकंद १७ हजार १६६ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.

Web Title: marathi news satara news Koyana Dam Monsoon Rain