आता मिनी फूड पार्कही उभारणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 मार्च 2018

सातारा : "फूड पार्कची संकल्पना शरद पवारांची आहे. यातूनच आता देशात असे मेगा फूड पार्क उभे राहत आहेत. सातारा मेगा पार्कमध्ये 5000 युवकांना रोजगार मिळणार आहे. हा पार्क झाल्यामुळे 25 हजार शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे. दरम्यान, आता मिनी फूड पार्कसाठीही 10 कोटी रुपये अनुदान दिले जाणार आहे'', अशी माहिती केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल यांनी दिली. 

बीव्हीजी ग्रुपच्या देगाव येथील मेगा फूड पार्कच्या उद्‌घाटन प्रसंगी गुरुवारी (ता. 1) त्या बोलत होत्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, खासदार उदयनराजे भोसले, संजय पाटील, आमदार शिवेंद्रराजे भोसले, शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, उपाध्यक्ष उमेश माने, फूड पार्कचे उपाध्यक्ष विजयकुमार चोले, रामदास फुटाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. बादल म्हणाल्या, "सातारा फूड पार्कला केंद्र शासनाने 50 कोटींचे अनुदान दिले आहे. पवार यांच्या काळात 42 मेगा पार्क दिले होते. 2014 ते 2018 पर्यंत आम्ही 12 फूड पार्क उभारले आहेत. एकाच ठिकाणी अन्नप्रक्रिया करण्याच्या सर्व प्रक्रिया होतील. आता केंद्र सरकाने मिनी फूड पार्कची संकल्पना आणली असून, त्यासाठी 10 कोटी अनुदान दिले जाणार आहे'', असे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री म्हणाले, ""प्रक्रिया उद्योग नसल्याने शेतीमालाच्या भावात तफावत होते. यावर फूड पार्क हाच उपाय आहे. केंद्राने सर्वांत जास्त फूड पार्क महाराष्ट्रात दिले आहेत'', अशी माहिती त्यांनी दिली. 

नुकसान टाळण्यासाठी फूड पार्क : शरद पवार 
शेतमाल ग्राहकांपर्यंत पोचेपर्यंत दरवर्षी सुमारे 50 हजार कोटींचे नुकसान होते. ते टाळण्यासाठी फूड पार्क योजना तयार केली होती. या प्रकल्पात शेतमाल तयार होण्यापासून प्रक्रिया, पॅकिंग, ब्रॉडिंग ते विक्रीपर्यंत व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील पहिलाच प्रकल्प सातारा येथे झाला असल्याचा आंनद होत असल्याचे शरद पवार म्हणाले. 

Web Title: Marathi news satara news mini food park