कऱ्हाड : मुदत संपूनही उत्खनन करणाऱ्या दगडाच्या खाणी सील

सचिन शिंदे
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

नांदलापूर येथे १७ दगडाच्या खाणी आहेत. त्यातील ११ दगडाच्या खाणींना उत्खननासाठी सहा महिन्याची  मुदत होती. चर उर्वरित सहा खाणींचू मुदत पाच वर्षाची मुदत आहे. सहा महिन्याच्या मुदतीच्या अकरा खाणींची मुदत संपली होती.

कऱ्हाड : मुदत संपूनही उत्खनन करणाऱ्या नांदलापूर येथील अकरा दगडाच्या खाणी तहसीलदार कार्यालयाने आज सील केल्या. तहसीलदार राजेंद्र शेळके यांच्या नेतृत्वाखाली आज दिवसभर कारवाई सुरू होती. संबधीत खाणींची मुदत संपून सहा महिन्यापेक्षा जास्त कालवधी झाला होता. त्यामुळे त्या सील करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

नांदलापूर येतील गट क्रमांक ४०९ मधील अकरा खाणी सील झाल्या. त्या खाणमालकांची नावे अशी ः विलास शिर्के, धोडिराम जाधव, मनोजकुमार जाधव, राजाराम कदम, सचिन शिर्के, पांडूरंग देशमुख, वसंत देशमुख, सतीश थोरात, अशोक जाधव यांच्या प्रत्येकी तर दत्तात्रय देसाई यांच्या दोन खाणींचा त्यात समावेश आहे. 

नांदलापूर येथे १७ दगडाच्या खाणी आहेत. त्यातील ११ दगडाच्या खाणींना उत्खननासाठी सहा महिन्याची  मुदत होती. चर उर्वरित सहा खाणींचू मुदत पाच वर्षाची मुदत आहे. सहा महिन्याच्या मुदतीच्या अकरा खाणींची मुदत संपली होती. त्यांना वारंवार त्याबाबत सांगण्यात येत होते. तोंडी व लेखीही सुचना दिल्या होत्या. मात्र तरिही त्यांनी उत्खनन सुरूच ठेवले होते. त्याबाबत वारंवार तहसीलदारांकडे त्याच्या विरोधात तक्रारी होत्या. त्यामुळे त्या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेवून प्रातांधिकारी हिम्मत खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार श्री. शेळके यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज त्या खाणी सील केल्या.

Web Title: Marathi news Satara news stone mine