नगरमध्ये पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

श्रीगोंदे - बारामती येथील एका कंपनीने फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केली जात असल्याने एका महाराजांनी आज पोलिस ठाण्यात पेट्रोल अंगावर ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच त्यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला. जगन्नाथ महाराज देशमुख (वय 55) असे त्यांचे नाव आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी देशमुख यांना अटक केली आहे.

बारामती येथील एका कंपनीकडून पशुखाद्य पुरवठा करण्यासाठी देशमुख यांनी एजन्सी घेतली होती. मात्र, संबंधित कंपनीने थेट पुरवठादाराला माल देताना बिल मात्र देशमुख यांच्या नावे काढले.

त्यामुळे देशमुख अडचणीत आल्याने या कंपनीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी होती. पोलिस निरीक्षक बाजीराव पवार यांनी हा विषय बारामती हद्दीतील असल्याचे सांगून त्यांची फिर्याद घेतली नाही. अनेकदा पाठपुरावा करूनही उपयोग होत नसल्याने देशमुख यांनी आज दुपारी पोलिस ठाण्यासमोर अंगावर पेट्रोल ओतून देशमुख यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार लक्षात येताच पोलिस कर्मचारी ढेरे, अमोल आजबे, प्रकाश वाघ यांनी त्यांना रोखले.

याबाबत पोलिस निरीक्षक पोवार यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. त्यात म्हटले आहे, की हा विषय बारामती हद्दीतील असल्याने आम्ही गुन्हा दाखल केला नाही. काही लोकांनी देशमुख यांना आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिल्याचे तपासात समजले आहे.

Web Title: marathi news shrigonde news suicide trying crime