कुर्डुवाडी येथील बाह्यवळण रस्त्यावर अपघात

विजयकुमार कन्हेरे
गुरुवार, 11 जानेवारी 2018

कुर्डुवाडी : येथील बाह्यवळण रस्त्यावर ऊस वाहतूक करणारा ट्रक व दोन टँकर यांच्या अपघातात ऊसाचा ट्रक पलटी झाला. यामध्ये ट्रकचालक जखमी झाला आहे. ही घटना बाह्यवळण रस्त्यावरील पुलावर गुरुवारी (ता. 11) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. बार्शीकडून कुर्डुवाडीकडे रिकामा टँकर (क्र. एम. एच. ०४ जी. आर. ३१४) जात होता. त्याला ऊसाचा ट्रक (एम. एच. ०६ ए. क्यू. ९२९६) ओव्हरटेक करत होता. त्यावेळी समोरून दुसरा टँकर (क्र. एम. एच. ०४ जी. आर. ३२७०) येत होता. ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व तो समोरील टँकरला धडकला. त्याबरोबर दुसऱ्या टँकरला ट्रक घासला. यामध्ये ऊसाचा ट्रक पलटी झाला.

कुर्डुवाडी : येथील बाह्यवळण रस्त्यावर ऊस वाहतूक करणारा ट्रक व दोन टँकर यांच्या अपघातात ऊसाचा ट्रक पलटी झाला. यामध्ये ट्रकचालक जखमी झाला आहे. ही घटना बाह्यवळण रस्त्यावरील पुलावर गुरुवारी (ता. 11) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. बार्शीकडून कुर्डुवाडीकडे रिकामा टँकर (क्र. एम. एच. ०४ जी. आर. ३१४) जात होता. त्याला ऊसाचा ट्रक (एम. एच. ०६ ए. क्यू. ९२९६) ओव्हरटेक करत होता. त्यावेळी समोरून दुसरा टँकर (क्र. एम. एच. ०४ जी. आर. ३२७०) येत होता. ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व तो समोरील टँकरला धडकला. त्याबरोबर दुसऱ्या टँकरला ट्रक घासला. यामध्ये ऊसाचा ट्रक पलटी झाला. ट्रक चालक गोरख घोगरे (वय ४० वर्ष, रा. कंडारी ता. परांडा जिल्हा उस्मानाबाद) किरकोळ जखमी झाला आहे.

 

Web Title: Marathi news solapur news accident on bypass