महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मंगळवेढा शाखेकडून पुरस्कार जाहीर

हुकूम मुलाणी
मंगळवार, 6 मार्च 2018

या पुरस्कारामध्ये एस. एल. भैरप्पा यांच्या कन्नड साहित्याचा मराठी अनुवादक करणार्‍या प्रसिद्ध साहित्यिका उमा कुलकर्णी यांच्या संवादु-अनुवादु या आत्मकथनास स्व. इंदूमती वसंतराव शिर्के स्मृती साहित्य पुरस्कार,  डॉ.एकनाथ पाटील यांच्या जागतिकीकरण वर्तमान आणि आव्हाने या संपादनास स्व.काशीबाई घुले स्मृती साहित्य पुरस्कार, हृषीकेश गुप्ते यांच्या दंशकाल या कादंबरीस शेपटाकार जगन्नाथ रत्नपारखी स्मृती साहित्य पुरस्कार तर योजना यादव यांच्या मरी मरी जाय सरीर या काव्यसंग्रहास रानकवी लक्ष्मण दुधाळ काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले.

मंगळवेढा : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मंगळवेढा शाखेकडून मराठी राजभाषा दिनाच्या औचित्याने 2018 च्या दुसय्रा राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये चार साहित्यिकांचा समावेश असून हा पुरस्कार 10 मार्च रोजी सायंकाळी 6 वा. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते व ज्येष्ठ लेखक राजन खान यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा आयाजित करण्यात आला असल्याची माहिती अध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली. 

या पुरस्कारामध्ये एस. एल. भैरप्पा यांच्या कन्नड साहित्याचा मराठी अनुवादक करणार्‍या प्रसिद्ध साहित्यिका उमा कुलकर्णी यांच्या संवादु-अनुवादु या आत्मकथनास स्व. इंदूमती वसंतराव शिर्के स्मृती साहित्य पुरस्कार,  डॉ.एकनाथ पाटील यांच्या जागतिकीकरण वर्तमान आणि आव्हाने या संपादनास स्व.काशीबाई घुले स्मृती साहित्य पुरस्कार, हृषीकेश गुप्ते यांच्या दंशकाल या कादंबरीस शेपटाकार जगन्नाथ रत्नपारखी स्मृती साहित्य पुरस्कार तर योजना यादव यांच्या मरी मरी जाय सरीर या काव्यसंग्रहास रानकवी लक्ष्मण दुधाळ काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, सन्मापत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.

नवलेखक सन्मानार्थ प्रथम प्रकाशित पुस्तकांसाठी स्व.रुक्मीणी जाधवबाई यांच्या स्मरणार्थ पाच नवउन्मेष राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. प्रत्येकी 500 रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप असून माचणूरचे सिद्धेश्‍वर पवार यांच्या गावगुंड या कथासंग्रहास, जतचे नवनाथ गोरे यांच्या फेसाटी या कादंबरीस, सांगोल्याचे राजू सावंत यांच्या ग्रामीण चालीरीती या माहितीपर पुस्तकास, पंढपूरचे सुजितकुमार कांबळे यांच्या टोळकं या कथासंग्रहास तर निकीता पाटील यांच्या दिलखुलास या ललित लेखसंग्रहास हे पुरस्कार जाहीर झालेले आहेत. या  सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन मसाप शाखा कार्याध्यक्ष इंद्रजित घुले, कार्यवाह गणेश यादव यांनी केले आहे.
 

Web Title: Marathi news solapur news award