भाजप नगरसेवकांना मुख्यमंत्र्यांच्या कानपिचक्या 

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 11 जानेवारी 2018

पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचा कारभार चालवा' गटबाजी थांबवा अशी ताकीद देउन मुख्यमंत्र्यानी बैठक संपविली.

सोलापूर : महापालिकेतील गटबाजीवरुन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी भाजपच्या नगरसेवकाना कानपिचक्या दिल्या. गटबाजीवरुन सार्यानाच झापले.

 वर्षा बंगल्यावर काल मध्यरात्री झालेल्या या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासह महसूल मंत्री , चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, रवी अनासपुरे, पालकमंत्री विजय देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, स्थायी समितीचे सभापती संजय कोळी यांच्यासह शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी व नगरसेवक उपस्थित होते. 

सभा काढण्यापुर्वी महापौर विश्वासात घेत नसल्याची तक्रार पालकमंत्री गटातील नगरसेवकानी केली. त्यावर मुख्यमंत्र्यानी सर्वानाच झापले. सोलापूरकरानी ज्या विश्वासाने तुमच्याकडे सत्ता दिली त्याचा काहीच फायदा त्याना झाला नाही. तुमची गटबाजी पाह्ण्यातच त्यांचे दिवस जात आहेत. हे प्रकार थांबले पाहिजेत अशी तंबीही मुख्यमंत्र्यानी दिली. 

पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचा कारभार चालवा' गटबाजी थांबवा अशी ताकीद देउन मुख्यमंत्र्यानी बैठक संपविली.

पालकमंत्री ठरवतील त्या नगसेवकास सभागृह नेत्याची संधी मिळेल असे या बैठकीत सांगण्यात आले. या बैठकीचे लाईव्ह अपडेट सोलापुरातील सोशल मिडियावर सुरु असल्याचा निरोप मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पोचल्यावर त्यांनी बैठकीत असलेले सर्व नगरसेवक- नगरसेविका तसेच वर्षा बंगल्याच्या प्रतिक्षालयात थांबलेल्या नगरसेविकांच्या पतीना मोबाईल बंद ठेवण्याचे आदेश दिले.

Web Title: Marathi news Solapur news BJP corporaters in Solapur