सोलापूर महापालिका स्थायी समितीतील आठ सदस्य बाहेर

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

महापालिका स्थायी समितीमध्ये 16 सदस्य आहेत. त्यांच्या सदस्यत्वाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील पहिले आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर निवृत्त होतात. ती नावे चिठ्ठीद्वारे निश्‍चित केले जातात.

सोलापूर : शुक्रवार 'घात'वार असल्याचे संकेत मिळाल्याने चिठ्ठी काढण्याचा दिवस ऐनवेळी पुढे ढकलण्यात आला. मात्र, निश्‍चित केलेला शनिवारही स्थायी समितीच्या 'त्या' सदस्यांसाठी 'घात'वारच ठरला आणि ते स्थायी समितीच्या बाहेर पडले. 

महापालिका स्थायी समितीतील आठ सदस्य आज (शनिवारी) चिठ्ठीद्वारे बाहेर पडले. पारदर्शी ड्रममध्ये पांढऱ्या कागदावर लिहून चिठ्ठ्या टाकण्यात आल्या होत्या. दिव्यांग कर्मचारी व विद्यार्थ्याच्या हस्ते चिठ्ठ्या काढल्या. यामध्ये भाजपचे चार, शिवसेनेचे दोन तर राष्ट्रवादी आणि एमआयएमचे प्रत्येकी एक सदस्य बाहेर पडले.

महापालिका स्थायी समितीमध्ये 16 सदस्य आहेत. त्यांच्या सदस्यत्वाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील पहिले आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर निवृत्त होतात. ती नावे चिठ्ठीद्वारे निश्‍चित केले जातात. फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत नवीन सदस्यांची नियुक्ती होणार आहेत. त्याअगोदर ही चिठ्ठीची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक होते.

चिठ्ठीद्वारे बाहेर पडलेले सदस्य -

सभापती संजय कोळी, रवी गायकवाड, श्रीनिवास रिकमंल्ले , मीनाक्षी कंपल्ली (भाजप), महेश कोठे, गुरुशांत धुत्तरगावकर (शिवसेना), नागेश गायकवाड (राष्ट्रवादी कॉंग्रेस) आणि तस्लीम शेख (एमआयएम). 

Web Title: Marathi News Solapur News Corporation 8 members exit