सोलापूर: संशयित दरोडेखोराचा पोलिसांवरच हल्ला; एकाचा मृत्यू

चंद्रकांत देवकते
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

याबाबत गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकच्या सीमेजवळ असणंऱ्यां मंगळवेढा तालुक्यातल सो ड्डी गावात दरोडेखोरांनी रात्रभर धिंगाणा घालून पाच घरे फोडली होती तर या दरोडेखोरांनी कस्तुरबाई रामन्ना बिराजदार वय ६५ हिचा खून केला होता तर मलकाप्पा बिराजदार यांना दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले होते.

मोहोळ : एका दरोडयातील आरोपीच्या शोधात निघालेल्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांवरच भर चौकातच संशयीत आरोपीने धारदार शस्त्राने हल्ला करून एकाचा खून केल्याची घटना मोहोळ एसटी स्थानकाजवळ शिवाजी चौकात मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडली. 

मंगळवेढा तालुक्यातील सोड्डी येथे पाच घरावर दरोडा टाकून एका वृद्ध महिलेचा खून झाला होता. त्या प्रकरणातील संशयीत आरोपी पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला खबऱ्यामार्फत आरोपी मोहोळ परिसरात असल्याचे समजल्याने त्या दरोडेखोराना पकडण्यासाठी मंगळवारी रात्री ८ वाजता मोहोळ येथील शिवाजी चौकात पोलिस पथक येताच पोलीस पथकावरच दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला सुरु केला. यावेळी तेथे जमलेल्या गर्दीतील आबु पाशाभाई कुरेशी हा पोलिसांना मदत करण्यासाठी गेला असता एका आरोपीने त्यांच्या गळ्यातुनच आरपार चाकू खुपसला. त्यास उपचारासाठी सोलापूरला नेत असताना त्याचे निधन झाले. या हल्ल्यात पाच पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची खळबळजनक घटना मोहोळ येथे घडली.

याबाबत गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकच्या सीमेजवळ असणंऱ्यां मंगळवेढा तालुक्यातल सो ड्डी गावात दरोडेखोरांनी रात्रभर धिंगाणा घालून पाच घरे फोडली होती तर या दरोडेखोरांनी कस्तुरबाई रामन्ना बिराजदार वय ६५ हिचा खून केला होता तर मलकाप्पा बिराजदार यांना दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले होते.

या गंभीर घटनेची दाखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक विरेश प्रभू अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार व त्यांची टिम मागील तीन दिवसांपासून या आरोपींच्या शोधत होती हे आरोपी मोहोळ परिसरात असल्याची खबर मिळाल्याने एलसीबी पथकाच्या दोन सुमो गाड्या व काही पोलीस मोटार सायकलवरती आरोपींचा शोध घेत असत रात्री ८ वाजता हे आरोपी मोहोळ येथील शिवाजी चौकात एका मोटार सायकलवर तीन आरोपी आढळून आले आरोपींना पाहताच पोलिसांनी पकडण्यासाठी झडप घालताच दरोडेखोरांनी हातातील तीक्ष्ण चाकूने सचिन मागाडे ,सचिन गायकवाड , बोंबीलवार , समीर खैरे या चौघीजनाच्या अंगावर सपासप वार करण्यास सुरुवात केल्याने ते गंभीर जखमी झाले . भर चौकात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये गोंधळ उडाला पोलिसांवर झालेला हल्यातील एका आरोपीस पकडण्यात पोलिसांना यश आले आहे या घटनेमुळे मोहोळ शहरात एकच खळबळ उडाली नागरिकांसह पोलिसांवर झालेल्या हल्ल्यामुळे पोलीस खात्याने तातडीने तपासाची चक्रे फिरवीत आरोपी ज्या दिशेने पळून गेले आहेत त्या दिशेने एलसीबी च्या पथकासह शिग्र कृती दलाची तुकडी कसून तपास घेत आहे.

पोलीसांच्या हलगर्जीपणामुळेच माझा चुलत भाऊ आबुचा दरोडेखोराकडुन खून झाला असुन एवढ्या क्रूर गुन्हेगारास अटक करावयास निघालेल्या अधिकाऱ्यांची  व पोलीसांची शस्त्रसज्जता कशी नव्हती ही बाब चिंताजनक आहे.  
- अनीस महामुद कुरेशी (मयताचा चुलत भाऊ )

Web Title: Marathi news Solapur news decoit attack police in Mohol