मंगळवेढा: शेतकऱ्यांचे अनुदान तहसिल कार्यालयात पडून

farmer
farmer

मंगळवेढा : 2015 मधील दुष्काळासाठीचा निधी वाटण्यास सुरूवात केली असून शेतकऱ्यांकडून बॅक खाते देण्यास विलंब होत असल्याने तहसीलकडे 10  हजार 727 शेतकऱ्यांचे अनुदान तहसिल कार्यालयाकडे पडून आहे.

2015 सालातील रब्बी हंगामातील पिकाचे नुकसान झाले झाले म्हणून शासनाने दुष्काळी निधी  मंजूर करून केला आणि हीच मंजूर निधी देण्यास विलंब होताच आ. भालके व अन्य लोकप्रतिनिधीनी गतवर्षीच्या हिवाळी अधिवेशनात पिक विमा व दुष्काळ निधी तातडीने देण्याबाबतचा ताराकित प्रश्‍न उपस्थित केला. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिक विमा व दुष्काळ निधी एक महिन्याच्या आत देण्याचे आश्‍वासन दिले होते. रब्बी पिक विमा दिला पण दुष्काळ निधीची रक्कम विलंबाने दिली. तालुक्यासाठी 9 कोटी 80 लाख 62 हजार 930 रु अनुदान इतका निधी तहसील कार्यालयास प्राप्त झाला या मदतीमध्ये हेक्टरी 2504 रु प्रमाणे मदत शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावर जमा करण्यात येत आहे. हे अनुदान नुकसान झालेल्या फळबाग शेतकऱ्याला मात्र वगळून असून यात फक्त 2015 ज्वारीचा पीक विमा भरलेल्या शेतकऱ्याला वगळून अन्य शेतकऱ्यांचा विचार केला.

तालुक्यातील आंधळगाव, बोराळे, मरवडे, मारापूर, मंगळवेढा, भोसे, हुलजंती या मंडलामधील एकूण 29181 बांधीत शेतकरी आहे. तलाठयांनी दिलेल्या यादीप्रमाणे प्राप्त अनुदानामधील 18454 शेतकऱ्याला अंदाजे पाच कोटी कोटींपेक्षा अधिक रू अनुदान बॅकेकडे जमा केले. अन्य बॅकानी हे अनुदान तातडीने जमा केले. पण भारतीय स्टेट बॅके कडे अपुरे मनुष्यबळामुळे हे अनुदान शेतकऱ्यांच्या खातेवर अनुदान जमा करण्यास विलंब असल्याने शेतकऱ्यांच्या नाराजीला सुध्दा महसूल खात्यालाच सामोरे जावे लागत आहे.

ज्या शेतकऱ्यांनी रब्बीचा पिक विमा घेतला नाही.पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तलाठ्याकडे असून अशा शेतकऱ्यांनी आपले बॅक खाते क्र तलाठयाकडे तातडीन जमा करण्यात यावेत.
-  प्र. तहसीलदार गणेश लव्हे

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही याबाबत विधानसभेत आवाज उठवून निधी मिळवला पण शासनाने यात फळबाग शेतकऱ्यांला वगळून पुन्हा अन्याय केला. याबाबत पुन्हा आवाज उठविणार असून. विदर्भ- मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी अनुदान खर्चून मोकळे झाले. पण राष्ट्रीयकृत बॅक दिलेले धनादेश बॅक खात्यावर जमा करण्यास विलंब करत जिल्हाधिकारींनी यात लक्ष घालावे शिवाय तलाठ्यानी तातडीने घरोघरी जावून खाते नं गोळा करावेत.
- आ. भारत भालके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com