'कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधावा'

हुकूम मुलाणी
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

31 डिसेंबर 2007 रोजी थकबाकीदार असलेल्या 2008 च्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. त्यावेळी 2007 चा कर्जदार चालू बाकीत धरल्यामुळे या माफीतून हा शेतकरी वंचीत राहिला. तर सध्या शासनाने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेसाठी 1/4/2009 रोजी घेतलेले कर्ज 30 जून 2016 रोजी थकीत असलेले शेतकरी या योजनेसाठी निवडले.

मंगळवेढा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी तालुक्यातून 23665 इतके अर्ज आले. यामध्ये शेतकऱ्यांनी व बँकेने दिलेल्या माहितीमध्ये तफावत आढळलेल्या 4507 शेतकऱ्यांची चार लेखापरिक्षामार्फत बँकेत चौकशी करण्यात येणार असल्याने कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधावा असे आवाहन सहायक निब॔धक म्हाळाप्पा शिंदे यांनी दिली.

यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 2433, बँक ऑफ इंडिया 560, युनियन बँक 169, स्टेट बँक ऑफ इंडिया 148, विदर्भ कोकण ग्रामीण बँक 335, बँक ऑफ महाराष्ट्र 745 व आयसीसीआय बँक 97 इतक्या शेतकऱ्यांचा या तफावतीमध्ये समावेश असून या चौकशीसाठी एस.आर.आडत, पी.डी.लिंबोळे, एफ.ए.अत्तरवाले, आर.पी.हरीदास या चार लेखापरिक्षकाची नियुक्ति करण्यात आली असून ते भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडीया, बँक ऑफ महाराष्ट्र, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, आयसीसीआय बँक, युनियन बँकेच्या शाखेत जावून कर्जमाफी रखडलेल्या शेतकय्रांच्या कर्ज खात्याची चौकशी करणार आहेत. त्यानंतर या मधील पात्र अपात्र शेतकरी ठरणार आहेत.

31 डिसेंबर 2007 रोजी थकबाकीदार असलेल्या 2008 च्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. त्यावेळी 2007 चा कर्जदार चालू बाकीत धरल्यामुळे या माफीतून हा शेतकरी वंचीत राहिला. तर सध्या शासनाने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेसाठी 1/4/2009 रोजी घेतलेले कर्ज 30 जून 2016 रोजी थकीत असलेले शेतकरी या योजनेसाठी निवडले. दरम्यान 2007 ते 31/3/2009 चे शेतकरी वाय्रावर सोडले तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी या योजनेपासून वंचीत राहिले. अगोदरच दुष्काळाने घेरले, बॅकांनी त्रासले अशा परिस्थितीत शासकीय मदतीची गरज असताना शासनाने नियम लावून वाय्रावर सोडले तालुक्यातून 23665 इतके अर्ज आले. त्यामध्ये या 2007 त 2009 या कालावधीत काही शेतकऱ्यांनी आपण शासन काही तरी घेईल या आशेवर अर्ज ही केले पण त्याच्याबाबत अजूनही निर्णय न  घेतल्याने अपात्र व्हावे लागणार आहे. शेतकय्रांच्या कर्जखात्यावर  थकीइत  रक्कम ऑगष्ट अखेरची गृहीत धरून डिसेबरला जमा झाल्या त्यामुळे तीन महिन्याचे व्याजही शेतकय्रांना भरण्याची वेळ या कर्जमाफीने आणली. 

31 मार्च 2009 पुर्वी कर्जदार शेतकरी 2008 कर्ज माफीपासून वंचित राहिले त्यांच्यावरच चालु कर्जमाफीतही अन्याय केला त्यांच्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार. 
- आ. भारत भालके 

Web Title: Marathi news Solapur news farmer loan waiver in Mangalwedha