सरकारच्या धोरणामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांमधून संताप

हुकूम मुलाणी
गुरुवार, 11 जानेवारी 2018

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यामधून आणखी शेतकऱ्यांकडील मकेची खरेदी करावयाची असल्याचे शासनास पत्रान्वये कळविले असून खरेदी करण्यास मान्यता देण्याची मागणीही केली असून मान्यता दिल्यास तालुक्यातील एकही शेतकरी वंचीत राहणार नाही याची काळजी घेणार आहे.
- सोमनाथ आवताडे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती

मंगळवेढा : शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मका हमी भाव केंद्रातील खरेदी नव्या वर्षापासून बंद केल्यामुळे तालुक्यातील 478 शेतकऱ्यांची जवळपास 15 हजार क्लिंटल मका खरेदीवाचून राहिल्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना कमी भावात मका विकण्याची वेळ आली. शासनाच्या या धोरणाबददल शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

शेतकऱ्याला शेतीतून मिळणाय्रा मालाला हमी भाव मिळावा व व्यापाय्राकडून होणारी लूट थांबावी. या उददशाने शासनाने फेडरेशनच्या माध्यमातून मका उत्पादक शेतकय्रांना मालाची विक्री करण्यासाठी तालुकास्तरावर शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे हमी भाव केंद्रे सुरु केल्यामुळे त्यामुळे तालुक्यातील तुर व मकेची विक्री करणाऱ्या शेतकय्राला या फायदा झाला. मंगळवेढा येथील हमी केंद्रावरील व्यवस्थेमुळे तालुक्याबरोबर सांगोला, पंढरपूर, मोहोळ व अन्य ठिकाणचे शेतकरी मालाची विक्री करण्यास येवू लागले आलेल्या शेतकऱ्याला एक रुपयात नाष्टा देवून त्यांचीही उपासमार थांबवली. ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या मकेची खरेदी करताना तालुक्यातून 840 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यामधील 362 शेतकऱ्यांकडून 1142.50 क्लिंटल मकेची खरेदी करुन त्यांच्या रकमा थेट शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावर जमा करण्यात आल्या.

31 डिसेंबरपर्यत खरेदी आली. आणखी नोंदणी 478 शेतकरी वंचीत असून त्यांना ही खरेदी बंद केल्यामुळे जवळपास प्रति क्लिंटल तीनशे रु कमी दराने खासगी व्यापाऱ्याला विकावी लागत असल्याने शेतकय्रांचे आर्थीक नुकसान होत आहे.गेल्या तीन वर्षापेक्षा यंदाच्या हंगामात चांगल्या पाऊस झाल्याने मकेचे उत्पादनही चांगले झाले पण हमी भाव केंद्र बंद झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला.

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यामधून आणखी शेतकऱ्यांकडील मकेची खरेदी करावयाची असल्याचे शासनास पत्रान्वये कळविले असून खरेदी करण्यास मान्यता देण्याची मागणीही केली असून मान्यता दिल्यास तालुक्यातील एकही शेतकरी वंचीत राहणार नाही याची काळजी घेणार आहे.
- सोमनाथ आवताडे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती

कमी भाव केंद्र सुरु झाल्यामुळे मकेला चांगला दर मिळत असल्याने नोंदणी केली पण 31 डिसेंबर नंतर खरेदी बंद केल्यामुळे मकेच्या विक्रीची कुठे करायची असा प्रश्‍न निर्माण झाला.
- मधुकर शिंदे मका उत्पादक शेतकरी

Web Title: Marathi news Solapur news farmer in Mangalwedha