सोलापूरात देशातील सर्वाधिक महाग पेट्रोल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

सोलापूर : देशात सर्वाधिक महाग पेट्रोल सोलापूरात मिळत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. पेट्रोलला एका लीटरसाठी 81.10 पैसे मोजावे लागत असल्याने वाहन चालक हवालदिल झाले आहेत.

सोलापूर : देशात सर्वाधिक महाग पेट्रोल सोलापूरात मिळत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. पेट्रोलला एका लीटरसाठी 81.10 पैसे मोजावे लागत असल्याने वाहन चालक हवालदिल झाले आहेत.

महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमेवर असणाऱ्या सोलापूरात वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमूळे सर्वसामान्य ग्राहक आणि पेट्रोलपंप चालकही हैराण झाले आहेत. आज सोलापूरात पेट्रोलचा दर 81.10 रुपये तर डिझेलचा दर 67.67 रुपयांवर गेल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. सोलापूरातला हा दर फक्त राज्यात नव्हे तर देशात सर्वाधिक असण्याची शक्यता आहे. हैद्राबाद, विजापूर, पुणे-मुंबई आणि धुळेसारख्या महत्त्वाच्या मार्गावर सोलापूर आहे. त्यामुळे सोलापूरातून मोठी वाहतूक सुरू असते. मात्र वाढत चाललेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे वाहन चालक कर्नाटक, तेलंगणात पेट्रोल आणि डिझेल भरत असल्याने सोलापूरातील पेट्रोल-डिझेल विक्रीवर मोठा परिणाम झालेले आहे. राज्य सरकारने अतिरिक्त कर कमी करून नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Web Title: Marathi news solapur news highest price of petrol in country from solapur