मंगळवेढा: जालीहाळ-सिध्दनकेरी ग्रामपंचायत उपसरपंच निवड प्रकरण न्यायालयात

हुकूम मुलाणी
शनिवार, 20 जानेवारी 2018

जालीहाळ सिध्दनकेरी ग्रामपंचायती निवडणूक नुकतीच चुरशीने पार पडली. त्यात सरपंचपदी सचिन चौगुले हे चार सदस्यासह विजयी झाले. विरोधी गटाला पाच जागा मिळाल्या होत्या. उपसरपंच पदांची निवडणूक ही 31 जानेवारीस होणार होती. ती सुधारित आदेशान्वये 21 जानेवारीस होणार आहे.

मंगळवेढा : तालुक्यातील जालीहाळ-सिध्दनकेरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाची निवडणूक ही दाखल केलेल्या याचिकेच्या अंतिम निर्णयास अधिन राहून पार पाडावी. असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले.

जालीहाळ सिध्दनकेरी ग्रामपंचायती निवडणूक नुकतीच चुरशीने पार पडली. त्यात सरपंचपदी सचिन चौगुले हे चार सदस्यासह विजयी झाले. विरोधी गटाला पाच जागा मिळाल्या होत्या. उपसरपंच पदांची निवडणूक ही 31 जानेवारीस होणार होती. ती सुधारित आदेशान्वये 21 जानेवारीस होणार आहे. शासनाच्या जनतेमधून थेट सरपंच निवडण्याच्या 1 मे 2017 अधिनियमाने सरपंचाला उपसरपंचाच्या निवडणूकीत मतांचा अधिकार नसल्याचे नमुद केले. त्यास हरकत घेणारी याचिका उच्च न्यायालयात संभाव्य सरपंच सचिन चौगुले यांनी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाच्या निवडणूकीत सरपंचास मतांचा अधिकार मिळावा म्हणून दाखल केली होती.

या दाखल याचिकेची सुनावणी 19 रोजी न्यायमुर्ती रणजित मोरे व न्यायमुर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर झाली त्यात हा आदेश देण्यात आला. याचिकाकर्त्याकडून अॅड अनंत वडगावकर व अॅड रविकिरण कोळेकर यांनी काम पाहिले.या याचिकेची पुढील सुनावणी 25 जानेवारी रोजी होणार आहे.

Web Title: Marathi news Solapur news jalihal grampanchayat