महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

दावल इनामदार
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

ब्रह्मपुरी (सोलापूर) : 'हर हर महादेव' च्या गजरात माचणुर (ता.मंगळवेढा) येथील सिद्धेश्वर यात्रा उत्सावात सुरु झाली. येथील मंदिरात मंगळवारी पहाटे पासून भाविकांनी गर्दी केली होती.                                              

ब्रह्मपुरी (सोलापूर) : 'हर हर महादेव' च्या गजरात माचणुर (ता.मंगळवेढा) येथील सिद्धेश्वर यात्रा उत्सावात सुरु झाली. येथील मंदिरात मंगळवारी पहाटे पासून भाविकांनी गर्दी केली होती.                                              

महाशिवरात्रीनिमित्त पहाटे चार वाजता प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड़  व तहसीलदार गणेश लव्हे यांच्याहस्ते 'श्रीं 'ची महापूजा करण्यात आली. पहाटे पासून दर्शनास लांबलचक रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसरात महिलांसाठी व पुरुषासाठी स्वतंत्र दर्शनरांगा केल्या होत्या त्यामुळे दर्शन करणे सुलभ झाले असून भावीकांनी समाधान व्यक्त केले. भिमा नदी पात्रात पाणी असल्यामुळे भाविकांची स्नानांची सोय झाली होती. लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या यात्रेत महाराष्ट्रसह, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील भाविकांना दर्शनाचा लाभ झाला. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत यात्रा समितीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

यात्रा समिती, पुजारी मंडळ ब्रह्मपुरी, श्री संत दामाजी मेडिकल फाउंडेशन व महिला हॉस्पिटल मंगळवेढा यांच्या वतीने भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी वाजत गाजत व शोभेच्या दारूगोळच्या आतषबाजीने माचणुर येथून सिद्धेश्वर पालखीचे मंदिरात आगमन झाल्यानंतर मिरवणूक काढण्यात आली. पायऱ्यावर महिलांनी मांडलेल्या आरतीतील आरासामुळे व विद्युत् रोषणाईमुळे मंदिर परिसर उजळून निघाला. यावर्षी यात्रेत दुकानांची संख्या वाढली असून समितीने योग्य नियोजन केल्याचे दुकानदारांनी सांगितले.

यात्रेमधे पार्किंग साठी दुचाकी व चारचाकी वाहनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मंगळवेढा भाविकांना येण्याजाण्यासाठी परिवहनच्या मंगळवेढा व सोलापूर आगाराने ज्यादा बसगाड़यांची सोय केली होती.         

"मंदिर परिसरात लाखों भाविकांचे 'श्री' चे दर्शन सुलभ होण्यासाठी महिला व पुरुषांना स्वतंत्र दर्शन रांगा असून पाच पोलिस उपनिरीक्षक, पुरुष व महिला पोलिस कर्मचारी नेमण्यात आले असून कर्कश आवाजाचे पुंगी वाजवीणाऱ्यास कारवाई करणेचे सक्त आदेश दिले आहेत", असे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी सांगितले. 

Web Title: Marathi news solapur news mahashivaratra