सोलापुरात सुरू होणार फॉरेन्सिक सायन्स लॅब 

परशुराम कोकणे 
बुधवार, 31 जानेवारी 2018

सोलापूर - निरनिराळ्या गुन्ह्यांमधील जप्त नमुन्यांचे शास्त्रीय पद्धतीने विश्‍लेषण हे पोलिसांच्या तपासात महत्त्वाचे असते. या विश्‍लेषणाचा अहवाल पोलिसांना लवकरात लवकर मिळावा यासाठी आता सोलापुरमध्ये लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणजेच फॉरेन्सिक सायन्स लॅब सुरू करण्यात येणार आहे. 

ही प्रयोगशाळा सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी असणार आहे. याकरिता शासनाने एक कोटी बासष्ठ लाख रुपये मंजूर केले आहेत. 

एखादा गुन्हा नेमका कशामुळे घडला हे शोधण्यासाठी पोलिसांचा बराच वेळ जातो, त्यामुळे तपासाला आणि पुढे गुन्ह्याचा निकाल देण्यास वेळ लागतो. गुन्ह्यातील नेमके कारण, मृत्यू कशामुळे झाला हे तपासण्यासाठी सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा सोलापुरात सुरू करण्यात येणार आहे. या लघु प्रयोगशाळेसाठी कायमस्वरूपी जागा मिळेपर्यंत तात्पुरती व्यवस्था म्हणून भाडेतत्त्वावर जागा घेण्यासाठी दोन लाख रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

शासनाच्या विविध विभागांकडून जागा उपलब्ध झाल्यास प्रयोगशाळेसाठी इमारत बांधकामाबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. 

सध्या राज्यात न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिपत्याखाली मुंबई (1958), नागपूर (1966), पुणे (1979), औरंगाबाद (1981), नाशिक (2004), अमरावती (2008), नांदेड (2015) व कोल्हापूर (2016) येथे एकूण आठ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. 

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी व्हिसेरा राखून ठेवला जातो. तो औरंगाबाद किंवा पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवून अहवाल मागविला जातो. सध्या अहवाल येण्यास पाच-सहा महिने वेळ लागतो. सोलापुरात प्रयोगशाळा सुरू झाल्यास लवकरात लवकर अहवाल मिळेल. त्यातून पोलिसांना गुन्ह्यांच्या तपासाला आणि न्यायाला मदत मिळेल. 
- डॉ. सतीन मेश्राम, विभागप्रमुख, न्यायवैद्यक शास्त्र

Web Title: marathi news solapur news marathwada news forensic laboratory