आठ महापालिकांच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू 

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

या महापालिकांमध्ये आहेत पोटनिवडणुका 
सोलापूर, नाशिक, जळगाव, पुणे व बृहन्मुंबई महापालिकांमध्ये सदस्यांचे निधन झाल्याने, तर नगर आणि उल्हासनगर महापालिकांत सदस्यत्व रद्द झाल्याने पोटनिवडणूक होत आहे. 

सोलापूर : महापालिका प्रभाग 14 क च्या पोटनिवडणुकीचे बिगुल अखेर वाजले. सोलापूरसह राज्यातील आठ महापालिकांच्या पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेची सुरवात निवडणूक आयोगाने केली आहे, त्यानुसार कार्यक्रमही जाहीर केला आहे. 

प्रभाग 14 क मधील कॉंग्रेसचे नगरसेवक रफीक हत्तुरे यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी 10 जानेवारी 2018 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी ग्राह्य मानली जाणार आहे. प्रभागनिहाय मतदार यादी विभाजन करण्याची जबाबदारी निवडणूक आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. 

आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 17 फेब्रुवारी रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर 26 फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. 27 फेब्रुवारी रोजी मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय याद्या 8 मार्च रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. 

विधानसभा मतदार संघात समाविष्ट झालेले मतदार आणि संबंधित प्रभागासाठी निश्‍चित झालेल्या मतदारांची संख्या एकसमान असेल याची खात्री केली जाणार आहे. लेखनिकांच्या चुका, दुसऱ्या प्रभागातील मतदारांची चुकून समाविष्ट झालेली नावे, विधानसभा मतदार संघाच्या यादीत आहेत, मात्र संबंधित प्रभागाच्या यादीत नाहीत, अशी नावे यादीत समाविष्ट करणे ही प्रक्रिया आयोगाने निश्‍चित केलेल्या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे. 

या महापालिकांमध्ये आहेत पोटनिवडणुका 
सोलापूर, नाशिक, जळगाव, पुणे व बृहन्मुंबई महापालिकांमध्ये सदस्यांचे निधन झाल्याने, तर नगर आणि उल्हासनगर महापालिकांत सदस्यत्व रद्द झाल्याने पोटनिवडणूक होत आहे. 

Web Title: Marathi news Solapur news municipal corporation bypoll