पत्नीनेच केला दिराच्या मदतीने पतीचा खून

चंद्रकांत देवकते
गुरुवार, 8 मार्च 2018

मोहोळ (सोलापूर) : दिरासोबत असलेल्या अनैतिक संबंधास आड येणाऱ्या पतीचा दोरीने गळा आवळून दिराच्या मदतीनेच खुन केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील कोळेगांव येथे मंगळवारी रात्री घडली.

मोहोळ (सोलापूर) : दिरासोबत असलेल्या अनैतिक संबंधास आड येणाऱ्या पतीचा दोरीने गळा आवळून दिराच्या मदतीनेच खुन केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील कोळेगांव येथे मंगळवारी रात्री घडली.

याबाबत मोहोळ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार युवराज उर्फ बापू देवीदास कापूरे हे आपल्या कुटुंबासह कोळेगांव येथे राहतात. त्यांच्या घरापासुन काही अंतरावर त्यांचा भाऊ आकाश देवीदास कापुरे वय २६ हा पत्नी सह राहतो. तर सुमारे दोनशे मिटरच्या अंतरावर युवराज यांचे आई वडील व भाऊ प्रेमनाथ राहतात. गेल्या पाच ते सहा महिन्यापासुन युवराज यांची पत्नी मोनाली (वय २१) हिच्याशी विवाहीत असणाऱ्या आकाश याचे प्रेमसंबध सुरू होते. दरम्यान दोन महिन्यांपूर्वी दुपारच्या वेळी मोनाली व आकाश युवराज यांच्या घरी एकत्र बसल्याचे युवराज यांनी पाहीले होते. त्यावरून त्याने पत्नीवर व भावावर संशय घेतला होता. तेव्हापासून तो पत्नीला याबाबत विचारणा करीत होता. त्यातुनच ६ मार्चला रात्री ११.३० च्या दरम्यान मोनाली व आकाश याने युवराज यांचा दोरीच्या साह्याने गळा आवळून संगनमताने खुन केला.

या घटने नंतर एका तासाने मयताची  पत्नी मोनाली ही सासु सासऱ्यांकडे गेली व पती युवराज यांना जागे करूनही ते  उठत नसल्याचे सांगितले. त्यावरून सास, व दीर प्रेमनाथ हे दोघेही युवराजच्या घरी आले व त्यांना उठविण्याचा प्रयत्न करू लागले. ते न उठल्याने मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले. पंरतु तपासणीअंती ते अगोदरच मयत झाल्याचे सांगितले. मोहोळ पोलीसांनी पंचनामा केला. त्या दरम्यान युवराज यांचा  दोरीने गळा आवळल्या मुळे मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलीसांनी तपासासाठी पत्नी मोनाली हिला ताब्यात घेतले असता पहिल्यांदा तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. तिच्याकडे कसुन चौकशी केली असता मी व माझे दिर आकाश यांनी संगनमताने गळा आवळून खुन केल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बुरंगे यांनी वरील दोघा विरोधात गुन्हा दाखल केला असुन पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे , विष्णु गायकवाड , पो.हे.कॉ शितलकुमार गायकवाड, ए एस आय पटेल, अधिक तपास करीत आहे. दरम्यान या दोघांनाही पोलीसानी ताब्यात घेतले असुन याबाबतचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Marathi news solapur news murder by wife and brother in law