मंगळवेढ्यातील खून व दरोड्यासाठी वापरलेली हत्यारे मिळवण्यात पोलीसांना यश     

हुकूम मुलाणी
शुक्रवार, 9 मार्च 2018

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्यातील सोड्डी येथे खून करून दरोडा टाकल्या प्रकरणी पोलीसांनी आरोपीची कसून चौकशी केली असून यात आणखी दरोडेखोरांनी सहभाग घेतल्याची शक्यता असून खून व दरोड्यासाठी वापरलेली हत्यारे मिळवण्यात पोलीसाना यश आले.                                      

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्यातील सोड्डी येथे खून करून दरोडा टाकल्या प्रकरणी पोलीसांनी आरोपीची कसून चौकशी केली असून यात आणखी दरोडेखोरांनी सहभाग घेतल्याची शक्यता असून खून व दरोड्यासाठी वापरलेली हत्यारे मिळवण्यात पोलीसाना यश आले.                                      

यात कस्तुराबाई बिराजदार (वय 65), मलकाप्पा बिराजदार (वय 65) या दोघांचा खून करून दरोडा टाकून दागिने लुटल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यातील आरोपी वैजीनाथ उर्फ किशोर रामा भोसले (वय 21 रा.जामगाव ता.मोहोळ) याने तपास अधिकार्‍यांना घटनेचे ठिकाण दाखवले. मयत कस्तुराबाईच्या गळयातील 15 हजार रूपये किंमतीचे अर्धा तोळयाचे 28 मणी असलेली माळ होती. हे सोन्याचे मणी कामती (बु.) ता.मोहोळ येथील सुनिता शिवानंद रेवणकर हिला वरील आरोपीने बारा हजार रूपये किंमतीला विकले होते. सदर दागिने कामती येथे विकल्याचे सांगितल्यानंतर तपास अधिकारी पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे, पोलिस हवालदार दत्तात्रय तोंडले, सहाय्यक फौजदार एम.बी.जमादार, हरीदास सलगर, विठ्ठल साळुंखे आदि पोलिस कर्मचार्‍यांनी जावून ते सोन्याचे दागिने ताब्यात घेतले असून सोन्याचे दागिने घेणारी ही महिला वयोवृद्ध आहे. आरोपीने खून करण्यासाठी वापरलेले हत्यार ही जामगाव येथे जावून पोलिसांनी जप्त केले आहे.

दि. 8 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री गावाशेजारील शेतामध्ये बसून आरोपी वैजनाथ उर्फ किशोर रामा भोसले यांच्यासह अन्य 7 साथीदारांनी झाडाखाली बसून मद्य प्राशन करून गावालगतच्या घरात पहिली चोरी केली. तिसर्‍या क्रमांकावर मयत कस्तुराबाई बिराजदार यांच्या घरात प्रवेश करताच मयत आवाजाने जागी झाली. तिने आरडाओरडा केल्यास अन्य लोक जागे झाले तर चोरी यशस्वी होणार नाही म्हणून  आरोपीने कस्तुराबाई हिचा चाकूने वार करून खून केला व हाती आलेला ऐवज घेऊन ते पुढच्या घरी गेले. त्यावेळी बंद घराचा दरवाजा तोडत असताना शेजारचे मलकाप्पा रेवगोंडा बिराजदार हे आवाजाने जागे झाले व बाहेर आले. आपल्या चोरीच्या कामात अडथळा ठरल्याने त्यालाही दगडाने ठेचून मारल्याची कबुली आरोपीने तपास अधिकार्‍यांना दिली.          

मोहोळ पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी मंगळवेढयात आणून या घटनेचा अधिक तपास केला जाईल आरोपीने सोड्डी येथे दरोडा टाकण्यासाठी शाईन कंपनीची व एच.एफ डिलक्स मोटरसायकल वाहनाचा वापर केल्याचे तपासात उघड झाले आहे. मोटरसायकल जप्त करणे व उर्वरीत आरोपींना अटक करणे आदी बाकी आहे, असे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी सांगितले.  

Web Title: Marathi news solapur news robbery and murder police