मृत तरुणी परत आल्याच्या अफवेने गोंधळ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

चेहरा मिळता जुळता; नातेवाईक, पोलिसांकडून खुलासा 
 
सोलापूर - तीन महिन्यांपूर्वी मृत्यू झालेली शीतल अडसुळे ही तरुणी परत आल्याच्या अफवेने सोलापुरात गोंधळ उडाला. घरी आलेली तरुणी येरमाळा येथून आल्याने परिसरातील नागरिकांनी देवीचा अवतार समजून दर्शनासाठी गर्दी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परत आलेल्या तरुणीचा मृत तरुणीशी काही संबंध नाही. दोघींचा चेहरा काहीसा मिळता जुळता आहे. याबाबत शीतलच्या घरच्यांशी खुलासा केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

एका स्थानिक वृत्तवाहिनीने अफवा पसरवणारी बातमी केल्याने अधिकच गोंधळ निर्माण झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेविषयी अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरसिंग अंकुशकर यांनी मंगळवारी रात्री मृत शीतलच्या कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. चौकशी केल्यानंतर सत्य समोर आले. 

''माझ्या नणंदेचे तीन महिन्यांपूर्वी निधन झाले. मृत शीतल परत आली, म्हणून परिसरातील नागरिकांनी अफवा पसरवली. तिला देवीचा अवतार मानून दर्शनासाठी लोकांनी गर्दी केली. घरात गर्दी खूपच वाढल्याने आमची मुलेही घाबरून गेली आहेत. 
- रूपाली अडसुळे, कुटुंबीय

''मृत शीतल अडसुळे या तरुणीशी घरी आलेल्या तरुणीचा काही संबंध नाही. नागरिकांनी तिला देवीचा अवतार समजून अफवा पसरवली आहे. अशाप्रकारे अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे''.
- पौर्णिमा चौगुले, उपायुक्त, गुन्हे शाखा
 
Web Title: marathi news solapur news rumour crime police