सिद्धापुर येथील मातुर्लिंग यात्रा सोमवार पासून

दावल इनामदार
गुरुवार, 11 जानेवारी 2018

ब्रह्मपुरी (सोलापूर) : महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मातुर्लिंग यात्रा सिद्धापुर (ता. मंगळवेढा) येथे सोमवार (ता. १५) पासून सुरु होत असून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती यात्रा समितीचे अध्यक्ष भीमगोंडा पाटील यांनी दिली.

ब्रह्मपुरी (सोलापूर) : महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मातुर्लिंग यात्रा सिद्धापुर (ता. मंगळवेढा) येथे सोमवार (ता. १५) पासून सुरु होत असून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती यात्रा समितीचे अध्यक्ष भीमगोंडा पाटील यांनी दिली.

 मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर येथील मातुर्लिंग गणपतीची यात्रा सोमवारपासुन सुरु होत आहे. सिध्दापूर पासून तीन किमी अंतरावर भिमा नदीच्या पात्रात गणपतीची स्वयंभु मुर्ती प्रकट झालेली असून नवसाला पावणारा बाळ गणपती म्हणून प्रसिध्द आहे. दरवर्षी संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीला येथे मोठी यात्रा भरते. हे महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. पारंपारीक बैलगाडीतून सहकुटुंब दर्शनाला येणारे भाविक लक्ष वेधून घेतात. 

यावर्षी नदी पात्रात पाणी नसल्यामुळे स्वयंभू गणपतीचे दर्शन होत असल्यामुळे भविकांची गर्दी होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या यात्रेत सकाळी सहा वाजता "श्रीं" ची महापुजा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते व आमदार भारतनाना भालके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून प्रमुख अतिथी म्हणून शाहू शुगर कारखान्याचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे राजे, खासदार शरद बनसोडे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक विरेश प्रभु ,मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे, पोलिस निरीक्षक मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुजेचा कार्यक्रम संपन्न होत असल्याची माहीती बापुराया रामगोडा चौगुले यांनी दिली. यात्रेत व्यापाऱ्यांसाठी चांगल्या प्रकारच्या सुविधा  देण्यात आल्या असून व्यापाऱ्यांना यावर्षीही कर आकारण्यात आला नसल्याची माहिती यात्रा समितीने दिली. यात्रा यशस्वी करण्यासाठी समस्त सिध्दापुर ग्रामस्त परीश्रम घेत आहेत.  

 

Web Title: Marathi news solapur news siddhapur yatra