सोलापूर जिल्ह्यात 1 लाख 34 हजार हेक्‍टरवर ऊस 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

सोलापूर - देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याकडे पाहिले जाते. या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे वेळेत भरलेले उजनी धरण आणि जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमुळे शिवारा शिवारात साठलेले पाणी याचा परिणाम जिल्ह्यात यंदा उसाची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 34 हजार 195 हेक्‍टरवर लागण झाली आहे. जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र 1 लाख 61 हजार 776 हेक्‍टर एवढे असून, यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा ज्यादा लागवड होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

दाच्या हंगामात उसाची उपलब्धता मुबलक असल्याने चांगला दर मिळण्याची आशा शेतकऱ्यांना होती; परंतु हंगाम सुरू झाल्यापासून सातत्याने कोसळणाऱ्या साखरेच्या दराने कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या झोपा उडविल्या आहेत. यंदाच्या हंगामात कारखाने फक्त एफआरपीचीच रक्कम देऊ लागले आहेत. पुढील हंगामात उसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असण्याची शक्‍यता असल्याने दर काय राहील, याचीच चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. 

Web Title: marathi news solapur news sugarcane sugar factory