सोलापूर बसस्थानकावरून १४ लाखांची बॅग लंपास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 डिसेंबर 2017

बस स्थानकावरील आगार कार्यालयातून कर्मचारी कार्यालयात जमा झालेले  १४ लाख रुपये बँकेत जमा करण्यासाठी एसटीमधून निघाले होते. चोरट्याने बॅग लंपास केली. त्यानंतर गोंधळ उडाला.

सोलापूर : सोलापूर बसस्थानकावर चोरट्याने एसटी महामंडळाच्या कॅशिअरची १४ लाखांची बॅग पळवली. ही घटना आज (शनिवारी) सकाळी ११ वाजता घडली.

बस स्थानकावरील आगार कार्यालयातून कर्मचारी कार्यालयात जमा झालेले  १४ लाख रुपये बँकेत जमा करण्यासाठी एसटीमधून निघाले होते. चोरट्याने बॅग लंपास केली. त्यानंतर गोंधळ उडाला.

फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप आणि पथकाने बस स्थानकावर धाव घेतली आहे. अधिक चौकशी झाली आहे.

Web Title: Marathi news Solapur news thief in Solapur