देशातील 123 विद्यापीठे होणार नाहीत बंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

सोलापूर - देशातील 123 विद्यापीठांची मान्यता रद्द केली आहे. यातील 20 विद्यापीठे ही महाराष्ट्रातील आहेत. ही विद्यापीठे आता शैक्षणिक संस्था म्हणून कार्यरत राहतील, असा मेसेज व्हॉट्‌सऍपवर व्हायरल होत आहे. हा मेसेज खोटा असून, त्यासोबत जोडलेले परिपत्रक (10 नोव्हेंबर 2017) हे अभिमत विद्यापीठासंदर्भातील आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देशातील अभिमत विद्यापीठांना त्यांच्या नावामध्ये अभिमत हा शब्द वापरणे बंधनकारक केले आहे. याविषयीचे परिपत्रक 10 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाले होते. या संदर्भातील बातमी सकाळच्या 13 नोव्हेंबरच्या अंकात आली होती. 10 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकात देशातील 123 विद्यापीठांनी "अभिमत' शब्द वापरण्याच्या सक्त सूचना केल्या होत्या. त्यातील बहुतांश विद्यापीठांनी त्यांच्या नावात बदलही केला आहे. 

या पार्श्‍वभूमीवर काही दिवसापासून व्हॉट्‌सऍपवर देशातील 123, तर महाराष्ट्रातील 20 विद्यापीठांची मान्यता रद्द झाल्याची पोस्ट फिरत आहे. यामुळे या अभिमत विद्यापीठात शिकणारे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून, यासंदर्भात काही अभिमत विद्यापीठांनी यूजीसीकडे (विद्यापीठ अनुदान आयोग) संपर्क साधला आहे. व्हॉट्‌सऍपवर व्हायरल झालेली पोस्ट व परिपत्रक यांचा एकमेकांशी संबंध नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: marathi news solapur news viral message on whatsapp